पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/१००

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मद्रासच्या वास्तव्यांतील कांही गोष्टीं. ७९ कळा बंद होऊन, टोपी हातांत घेऊन एकवारही मान वर न करतां त्यानें धूम ठोकली ! त्या प्रसंगाचें स्मरण होऊन ही गोष्ट सांगतांना केव्हांही अण्णासाहेबांना हसूं येत असे. 1 अशाच प्रकारची दूरदर्शनाचीही एक गोष्ट ते सांगत. पंचपक्षी विद्या म्हणून एक क्षुद्र विद्या आहे. तिच्या योगानें ही सिद्धि येते. ती विद्या साध्य असलेला एक मनुष्य यांच्या पाहण्यांत आला. तेव्हां त्यास आपले समोर बस- चून घेऊन त्यांनी रामास शेजारच्या गांवीं एका इसमाकडे पाठविलें; व तो काय करतो आहे, म्हणून या माणसास विचारले. तेव्हां जसजसा रामा गेला, व त्यानें वाटेंत, लघ्वास बसणे, कोणाशीं भाषण करणें, चिलीम ओढणें वगैरे ज्या ज्या क्रिया केल्या, त्या त्या सर्व त्यानें क्रमानें तशाच सांगितल्या, व शेवटी ते दोघेही गृहस्थ येत आहेत म्हणून सांगितलें ! अशाच प्रकारें किमयेचाही अनुभव त्यांनी मद्रासेस घेतला. पूर्वी तात्या- साहेब रायरीकर यांच्या येथे एका मनुष्यानें, ओंकारेश्वरांच्या केवळ कांही वनस्पती आणून, पैशाचें सोनें चिलमींतल्या चिलमीत करून दाखविल्याचें यांना स्वतः पाहिलें होतें, व त्यावरून किमयेची विद्या खरी आहे, अशी यांची खात्री झाली होती. तसाच गोसाव्यांच्या एका महंतानें मद्रासेस यांना ·कथलाची चांदी करून दाखविण्याचा प्रयोग करून दाखविला भट्टींत कथील आपल्या हातानें ठेवणें, वनस्पतींचा रस तिच्यावर आपल्या हातानें ओतणें, व त्याच्याजवळील पायाच्या विशेष प्रकारच्या भस्माची त्यास भावना देणें, वगैरे सर्व गोष्टी यांनी आपल्या हातांनी केल्या, व स्वतःच्या हातानें भट्टींतून चांदी बाहेर काढली! हा गोसावी असे सांगत असे की, सेळ्याच्या पोषणाकरितां गुरूंनी ही विद्या त्यास दिली होती, व कोणास सांगूं नको म्हणून बजावून, वर पुन्हा जरी यदाकदाचित् कोणास कळले तरी त्यास फलद्रूप होणार नाही म्हणून सांगितले. अण्णासाहेबांनी स्वतः वनस्पती आणून व त्याच्या जवळील भस्म घालून चांदी करण्याचा प्रयत्न केला, परंतु काय कमी पडलें असेल तें असो, त्यांचा स्वतंत्र प्रयत्न कधीही साधला नाही. कथलाची चांदी तर होत असे, परंतु मुशीतच ती फुटून तिचे राईएवढाले तुकडे होत. एक -गट असा कधीं काढतांच आला नाहीं, व त्यामुळे ती वांया जात असे. मग हें गुरूचें वाक्सामर्थ्य असो, किंवा त्या गोसाव्यानें मुद्दाम कांही गोष्ट चोरून