पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/१०५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

८४ सालरजंग प्रकरण व मद्रास. दोन कार्तिकस्वामीची स्थानें आहेत. पैकी लहान तर तिरुतणीस यांच्या घरा- समोरच अर्ध्या पाऊण मैलावर होतें. या दोन्ही स्थळी स्त्रियांचा यत्किंचितही प्रवेश नसून, पर्वदिवशी वगैरे व एरवीं सुद्धां तेथें खंडोगणती कापूर जळत असे. या स्थानाबरोबरच पलिपट येथेंही ते जाऊन आले होते. तेथें जवळच भद्रं- चल म्हणून डोंगर आहे, त्यावर एक स्वामी रहात असत. हे ठेंगण्या बांध्याचे असून दिगंबरवृत्तीनें अखंड मीन धारण करून असत. यांच्याही दर्शनाचा योग अण्णासाहेबांस अनायासेंच आला. डोंगरावरून धांवत खाली उतरत असतां लोकांनीं यांना ते स्वामी दाखविले. तेव्हां आपण धांवत जाऊन एक- दम त्यांचे पाय धरून त्यांस उभे केले म्हणून अण्णासाहेब सांगत. परंतु त्यामुळे रागावून न जातां वायव्येकडे पाहून स्वामींनी थोडेसें हास्य केलें, एवढेंच अण्णासाहेब सांगत. पलिपट येथील ज्या शिवानंदतीर्थांशी तात्यासाहेब कर्वे यांच्या गुरुपरंपरेचा संबंध आहे, ते शिवानंद आणि हे महाराज हे एकच असावे असा संशय येतो. परंतु त्याचे निराकरण करण्यास कांहींच मार्ग नाही. कदाचित दोघेही वेगवेगळे असूं शकतील. असो. मद्रासमधें अण्णासाहेब यांचा मुक्काम ४३ महिने १२ दिवस होता, वहा सर्वच काळ त्यांच्या आयुष्यांत अत्यंत महत्त्वाचा होय. त्याचा ठसा त्यांच्या- वर अखेरपर्यंत दिसत होता. या ठिकाणी त्यांनी अनेक गोष्टी करून पाहिल्या, आणि अनेक विचित्र अनुभव घेतले, आणि कधी कोणाच्या स्वप्नींही यावयाचें नाही, असे अनुभव अकल्पित योगायोगानें त्यांना मिळाले. त्यांच्या व तेथील लोकांच्या राहणीच्या वगैरे अनेक गोष्टी ते सांगत. तिकडील विंचवांच्या दंपत्य- प्रेमाची, ताडपांबू ( झाडावरील साप ) नांवाच्या सापाच्या खुनशीपणाची, त्यांनी स्वतः दोन फणाचा नाग पाहिला होता त्याची व मद्रासी लोकांचे आहारविहार, चालीरीति, त्यांच्या भाषा, व त्या भाषांवरून निघणारी अनेक ऐतिहासिक अनुमानें, वगैरेंची सविस्तर हकीगत त्यांच्या तोंडून पुष्कळांस ऐकावयास मिळाली असेल. दोन तोंडी नागाविषयीं ' तें जुळे असेल, ' अशी मी शंका काढली; तेव्हां ' तो हातभर लांब असून मी स्वतःच पकडला होता' असें त्यांनी सांगितलें. त्याच्या चिमुकल्या दोन्ही फणा इकडे तिकडे तो कसा हालवी, याचें त्यांनी बोटाच्या पेयांनी मोठे सुंदर अनुकरण करून दाखविलें,