पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/१०६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कांद्याची कोशिंबीर. 3 सूर्यसंक्रांतीवरून मेषमास वगैरे महिने ओळखणें, ‘ कार्पासंकटिनियुक्तं ' वगैरे शास्त्र हे सर्व त्यांच्या मद्रासेंतील रहिवासाच्या खुणा होत. इकडे यावयाचें ठरल्यावर सर्व तयारी करून ते कंचीस गेले, आणि प्रथम शिवकांचीस जाऊन तेथून श्रीवरदराजाचे दर्शनास विष्णुकांचीस जाऊन श्रीराम- चंद्र अय्या यांचें त्यांनीं दर्शन घेतले. आणि तेथून मद्रास मेलने पहिल्या वर्गानें पुण्यास येण्याकरितां स्टेशनवर गेले. त्यांस पोहोचविण्याकरतां, कंचीचे महाराज स्वतः स्टेशनवर आले होते. गाडीची वेळ झाली, अण्णासाहेब डब्यां- तही जाऊन बसले, तरी देखील डब्याच्या फळीवर एक पाय देऊन प्लॅटफॉर्म वर उभ्या असलेल्या रामचंद्रस्वामींचा दांड्याचा हात सुटेना. तेव्हां आतां आपण थांबा, गाडीनें शिटी दिली ' असें अण्णासाहेबांनी विनविलें. तेव्हां कुठे " मी तुझ्याबरोवर येतों' असे शब्द त्यांच्या तोंडून बाहेर पडले ! त्यासरशी मोठ्या संतोषानें अण्णासाहेबांनी बाहेर उडी टाकली आणि स्वतः तिकीट काढून आणले, व सारीच मंडळी गाडींत बसून गाडी सुरू झाली, आणि त्या प्रांतास त्यांनी अखेरचा रामराम ठोकला. वाटेंत घडलेली एक रामचंद्र अग्र्यांची मौजेची गोष्ट त्यांनी सांगितली. कृष्णास्टेशनवर त्यांनी अग्र्यांच्या स्नानसंध्येकरितां म्हणून मुक्काम केला होता. आचाऱ्यास स्वयंपाकास लावून ते स्वतःही पुष्कळ दिवसाच्या वाढलेल्या दाढी जटांना फांटा देऊन, स्नान वगैरे करण्यांत गुंतले. ' त्यासाली कन्यागत असून कृष्णेच्या स्नानाकरितां तेथें उतरलों,' असे सांगितल्याचें थोडेंसें आठवतें; परंतु नक्की नाहीं. तें कांहीही असो, स्वामींचें आह्निक आटोपल्यावर दोघेही पानावर जाऊन बसले, आणि रामचंद्र अग्या श्रीवरदराजांस नैवेद्य समर्पण करण्यांत गढून गेले. थोड्या वेळानें ध्यान विसर्जन करून स्वामींनी मोठ्या सचिंत मुद्रेनें ताटांतील कोशिंबिरीकडे बोट करून विचारलें- ' हा काय पदार्थ आहे ? अण्णासाहेबांचेंही तिकडे लक्ष नसल्यामुळे, आचाऱ्याजवळ चौकशी करून ' पलांडू, ' म्हणून त्यांनी सांगितले. तेथें दुसरी भाजी कोणचीच मिळाली नाहीं, म्हणून त्या ब्राह्मणानें मूर्खपणानें कांद्याचीच कोशिंबीर केली होती, हैं अण्णासाहेबांच्याही लक्षांत आले नव्हतें. ' पलांडू' म्हणून ऐकतांच, स्वामी म्हणाले–“ तरीच बरें, स्वामी ( वरदराज ) खातांना तोंड वेडेंवांकडें करीत होता ! आतां काय करावें ? मी तर आजन्मांत पलांडूला शिवलों नाहीं. '