पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/१०८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

स्थित्यंतर.

    • " सुप्रतिष्ठित स्वानंदसहित स्वानुभव सुप्रतिष्ठा सिध्यर्थ "

येथपासून अण्णासाहेब यांच्या आयुष्यांतील दुसऱ्या अर्थास सुरुवात होते. या भागांतील पहिली ७१८ वर्षे म्हणजे जवळ जवळ गणपतिउत्सवास सुरु- बात होईपर्यंतचा काळ यांनी कशा रीतीने घालविला, त्याचा इतिहास कांहींच मिळत नाही. स्वतः ते यासंबंधानें एक अक्षरही काढीत नसत. तरी एवढे माल खास कळतें की या काळांत त्यांचे सर्व व्याप थांबले असून त्यांनी बहु- तेक मौनवृत्ति धारण केली होती. मग ती दुखण्याच्या अशक्ततेमुळे असो, अथवा एखाद्या चिंतनांत अखंड गहून गेल्यामुळे असो. त्यावेळीं या विषयाचें शाब्दिक का होईना, परंतु ज्ञान असलेला, आणि या दृष्टीने त्यांच्याकडे पाह- णारा असा त्या वेळचा कोणीही मनुष्य उपलब्ध नसल्यामुळे, आणि स्वतः त्यांच्या स्वभावाच्या अचलप्रतिष्ठेमुळें, या तऱ्हेची त्यांच्याविषयी माहिती मिळणेही अशक्य आहे. 'अण्णासाहेब अमुक साधनें करीत होते, ' ' त्यांनी आपलें हृद्गत मलाच तेवढे सांगितलें, ' अथवा 'मी त्यांचा अभ्यास ओळ- खला, मीं त्यांना पकडलें, ' आणि " त्यांनीही हंसून पकडलों गेलों ' म्हणून कबूल केलें, अशा प्रकारच्या गोष्टी सांगणारे आणि प्रामाणिक सम- जूत बाळगणारे कांहीं कमी आढळत नाहीत; आणि त्यांपैकी कोणालाही मूर्खा- तच काढण्याचे कारण नाही. कारण व्यक्तीप्रत त्याला अनुसरून इतक्या साया रंगानें ते बोलत असत, व त्यामुळे असे तर्क दुसऱ्यांनी केले असल्यास नवल नाही. मात्र त्यांत इतकीच खुबी असे की, ' मी स्वतः अमुक केले' असें तें अगदर्दीच २१४ प्रसंग टाकले तर उभ्या आयुष्यांत बोलल्याचें कोणीच सांगत नाही. 'आपण काय केलें नाहीं, ' हे मात्र तेथल्या तेथेंच सांगत. आणि व्यवहारिक गोष्टींत मात्र, एकाद्या सामान्य माणसाप्रमाणे आपल्या मागच्या हकीगती केव्हां केव्हां सांगत. त्यांच्या बोलण्यांत वैद्यक किंवा कायदा हे दोन विषय सोडले तर या बाजूचे ग्रंथ वगैरे वाचल्याचा कधींही उल्लेख नसावयाचा. परंतु माहिती माल अमुक प्रकारची त्यांस नव्हती असे कधींच अनुभवास