पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/१०९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

स्थित्यंतर. आलें नाहीं. उलट ती माहिती सांगण्याची तन्हा अशी होती कीं, ऐकणा- रास " कांही आपण विशेष ऐकत आहों, " असे भासूं नये. यामुळे, आपल्या पारंब्यांचे वृक्ष बनवून दुर्गम असा छायामंडप घालणा-या कबीर वडा- प्रमाणे यांच्याही स्थितिमंडपाचा मूळबुंधा कोणता, हे सांगणे आटोक्याबाहेर आहे; आणि तशा तऱ्हेचा प्रयत्न करणेही एक प्रकारें पापच आहे; कारण त्याच्यायोगानें या मूर्तीच्या गौरवाचें वर्णन न होतां या साक्षात् विनायकाचें वानर होण्याचाच जास्त संभव आहे. परंतु त्याजबरोबर हीही गोष्ट उघड आहे कीं, एकदां चरित्रकार म्हणून लिहावयास बसल्यावर अशा प्रकारचा प्रयत्न करणें हेंही प्राप्तच आहे. ८८ अण्णासाहेब हा शब्द उच्चारला कीं, ज्या कांही शेंकडों जिज्ञासा कोणाही माणसाच्या मनांत उभ्या रहातात आणि त्या पुरण्याच्या अपेक्षेनेंच तो चरित्र हातीं घेतो, त्या सर्व जिज्ञासांत परमार्थ या दृष्टीने अण्णासाहेब हें प्रकरण होतें तरी काय, त्यांचा अभ्यास काय होता, त्यांचें साध्यसाधन आणि त्याकरितां त्यांनी केलेले प्रयत्न तरी काय होते, ते कोणी प्राप्त पुरुष होते, किंवा केवळ भाविक भगत होते, इत्यादि जिज्ञासाच बलवत्तर होत. आणि चरित्रकारानें जर याच प्रश्नांकडे दुर्लक्ष करावयाचें तर चरित्रलेखनाचा उपयोग तरी काय, असे वाटून अवांतर सर्व गोष्टी वाचकांच्या मनांतून उतरणें साह- जिक आहे. तेव्हां आपणही त्यांनी काय केलें होतें, किंवा काय केले नव्हते, याचा विचार न करतां, काय दिसत होतें, आणि त्यावरून काय असण्याचा जास्त संभव आहे. एवढेच फक्त पाहूं. त्यांतील काय दिसत होतें, म्हणजे वेळोवेळां त्यांनी जे उद्गार स्वतः काढले तो प्रत्यक्ष पुरावा असल्यामुळे तेव- ढाच मात्र निःशंकपणे खरा समजला पाहिजे. त्यावरून जीं अनुमानें काढा- वीशीं वाटतात, त्याविषयीं समर्थांच्या म्हणण्याप्रमाणे-- मानेल तरी पाहिजे घेतलें । कोणी येकें । ' दास.- एवढेच म्हणता येईल संबंधी जनांकडे पाहिले तर, " अण्णासाहेब यांच्या सर्व कृतींत भरून राहिलेले श्रीनृसिंह सरस्वती हा देखील एक खंदकच असून त्याच्या आड काम करणारे अण्णासाहेब हे स्वतःच कर्तुमकर्तुमन्यथाकर्तु अशा परमात्म्याचा गुप्त अवतार होते, " असे मानण्यापासून, तो “ देशाच्या कल्याणाची सदिच्छा मनांत बाळगून--' बापा पोराबाळांचें कल्याण कर' म्हणून देवापुढे नाकदुया "