पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/११३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

९२ स्थित्यंतर. शक्य आहे. एक तर उत्कृष्ट बुद्धीमुळें; सर्व प्रकारचा साधकबाधक विचार करून मनुष्य तुमच्यासारखा वागू शकेल; अथवा श्रद्धाळूपणानें; केवळ एकाद्या वडील माणसानें सांगितलें म्हणून आपण मुकाट्यानें करावें, अशा रितीने असा वाणूं शकेल; अथवा, एकाद्या बारीक गोष्टींत कांहीतरी सत्य दिसून आल्यामुळे बाकीच्याही अशाच खऱ्या कशावरून नसतील, असे समजून प्रयोग पाहण्या- करितां वागूं शकेल; किंवा भयंकर निराशेनें आयुष्यांतील चव निघून गेल्यामुळे, कांहीं तरी सन्मार्गानें तें घालवावयाचें तर आपल्या वाडवडिलांच्या मार्गानेंच तें कां घालवूं नये, अशा समजूतीनेंही तो असा वागेल. असें तुमचें काय झालें ? " पांचवा प्रत्यक्ष प्रतीतीचा मार्ग मात्र बोलून दाखविला नाही. यावेळी रात्रीचे दोन वाजले असून नक्षत्र दर्शनाकरितां गच्चीवर जावयास ते निघाले होते, व त्यांचे शांत गंभीर अंतःकरणही त्यावेळी अधिक प्रसन्न होतें, अशा तऱ्हेचे कांहीं प्रश्न आले असतां चिडून गेल्याचा आविर्भाव करून अथवा विचारणाराची कांही तरी चेष्टा करून, प्रश्न टाळून नेण्याची त्यांची नेहमींची संवय होती. परंतु यावेळी तसें कांही न होतां, प्रश्न ऐकतांच ताड्दिशीं, " अरे, सर्व प्रत्यक्ष पाहिलें ना, महाराजांच्या कृपेनें ? " असे शब्द एकदम बाहेर पडले. परंतु तेवढ्यांतच झटक्यासरशीं ते गच्चीवर निघून गेले. परत आल्यानंतर मोठे धैर्य धरून पुन्हा विषय उकरून काढला. परंतु नेहमींच्या पद्धतीप्रमाणे ' अरे, सर्वाचें सार इतकेंच की किती अज्ञान आहे, आणि केवढे अफाट काम करावयाचें असतें, एवढे कळलें ! अशा तऱ्हेची उत्तरें येऊन तो विषय सोडून द्यावा लागला. महाराज हा शब्द त्यांच्या भाषेत मायागुण नियामक परमात्म्याचा वाचकच होता. तसेंच एक वेळां स्वतःच्या छातीस हात लावून ' येथेही महाराजच आहेत, फक्त प्रकार निराळा इतकेंच. त्याच- प्रमाणें एकदां एका गृहस्थास ' हैं शरीर ( स्वतःचें ) महाराज रूप कसें झालें,' तें थोडक्यांत सांगण्याचा उपक्रम त्यांनी केला होता, परंतु नेहमीप्रमाणें तो तेवढाच राहून गेला. त्यांना केव्हां केव्हां रोजनिशी लिहावयाची हुक्की येत असे, व त्या वेळेला, कांही तरी लिहावें, असा त्यांचा परिपाठ होता. ही रोज- निशी म्हणजे एक मोठें गौडबंगालच आहे. हरिपाठाच्या एका पुस्तकांत जिथे कुठें लहर लागेल, तेथें कांही तरी एकदोन वाक्यें लिहून ठेवावीं, अनुक्रम अथवा संगतीचें नांव ही नको, एकाद्या ठिकाणी, १९१२ सालचा उगीच