पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/११५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

स्थित्यंतर. संगति लागत नाहीं, म्हणून प्राथमिक कोटींत त्यांस टाकूनही मनाचें समाधान होत नाहीं. अण्णासाहेब पूर्वी प्राणायाम करीत असत, असे सांगणारी माणसें भेटतात. आणि त्यांच्या मांडी घालण्याच्या पद्धतीवरूनही सिद्धासनाचा अभ्यास केव्हां तरी त्यांनी पुष्कळ केला असावा असे वाटतें. तशीच दुसरी त्यांच्याविषयींची आश्चर्यकारक गोष्ट अशी होती कीं, अगदी अखेरची दोन- तीन वर्षे टाकली तर ते कधींही पाय ताणून निजले नाहीत ! आधीं झोपच मुळी दोनचार दिवसांनी घ्यावयास सांपडावयाची, व तेव्हां देखील एकाद्या •तासापलीकडे जास्त निजलेले कधी कोणी पाहिले नाहीत. परंतु त्यावेळी देखील गुडघे वर करून पोटरी व टांच मांडीशी जुळवूग उभे ठेवावयाची त्यांस संवय असे. असल्या थोड्याशा गोष्टी सोडल्या तर, एकांत, चित्ताची एकाग्रता करण्याचा प्रयत्न, अगर एकाग्रता, प्राणायाम- वगैरे कांहींही त्यांनी कधीं केले नाही. उलट त्यांचें सर्व आयुष्य उघड्यावर, चार माणसांच्या मधे गेलें. त्यामुळे तर आणखीच घोंटाळा होतो. परंतु थोडेंसें विचारपूर्वक पाहिलें •तर असे आढळून येईल की, घोंटाळ्याचें कांही कारण नाही. हें कसें तें आपण थोडक्यांत पाहूं. C अण्णासाहेब हे वैदिक संस्कृति आणि वेदमार्ग यांचे अभिमानी होते, आणि त्या मार्गानें वागावयाचें, असा त्यांचा कटाक्ष असे. वेदांवर त्यांची अढळ निष्ठा असून वेदाच्या पायावर उभारलेला वर्णाश्रमधर्म हाच सर्वोत्कृष्ट धर्म होय, असे ते म्हणत असत. हा वर्णाश्रमधर्म म्हणजे काय हे आपण थोडक्यांत पाहूं. वैदिक तत्त्वज्ञानाचा सारांश काढून पाहिले, तर त्याचा अर्थ इतकाच आहे कीं, अनिर्वाच्य ' अर्निर्देश्य, निर्गुण, निर्विकार असे जें कांही ओतप्रोत भरलेलॅ आहे तेंच या सर्व विश्वाचें त्रिकालाबाधित अनाद्यंत मूळ रूप होय. आणि त्याच्यावर हें गोचर विश्व मायावादाप्रमाणें केवळ मिथ्या भासून अथवा • इतरणवादाप्रमाणे अनध्यस्तविवर्तरूप भासतें. आणि त्यांतच पुढे पर्याय होऊन नानाकार रूपच सत्यत्वानें भासतें. अर्थातच हें नानाकारत्व जाऊन आणि त्यांतील विवर्तरूपता अथवा मिथ्यात्व जाऊन केवल एकरूपता होणें हेच जीवाचें अंतिम पर्यवसान आहे. हे जरी असले तरी तशी स्थिति प्राप्त व्हावी म्हणून त्याला जें हें विवर्तरूप आलेले आहे तें सत्य मानूनच प्रयत्न केला पाहिजे. हा प्रयत्न कंशा रीतीनें करावा, याचा शोध करीत असतां