पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/११८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

चार मार्ग. होऊन मूळ संवित्स्वरूपांत मिळून जाऊं. याच तत्त्वावर मूळ चार साधन- प्रकार उत्पन्न झाले व त्यांचे मिश्रण होऊन पुढे लक्षावधि साधनें झाली. प्राणशक्ति हाती घेऊन तिच्यायोगानें बाकीच्या शक्ति ताब्यांत आणावयाच्या आणि शक्तिमय होऊन जावयाचे, हा हठयोग म्हणून म्हणविला. मनाची शक्ति प्रथमतः ताब्यांत घेऊन एका बाजूनें शरीरासह प्राण व दुसऱ्या बाजूनें बुद्धि आणि वाक् या इंद्रियातीत शक्ति जिंकावयाच्या, आणि त्यानें शक्तिरूप होऊन जावयाचें, हा राजयोग होय. या दोन्हींचाही क्रम शरीर आणि मन या दोन जडदृश्यांस सुरुवात करून त्यांचे चैतन्यांत रूपांतर करण्याचा आहे. परंतु वाक् आणि बुद्धि या ज्या दोन अतींद्रियशक्ति त्यांचा क्रम अर्थातच उलटा,- म्हणजे शरीरांतील एकेक तत्त्व चैतन्यरूप करीत करीत शेवटीं या जड शरीरापर्यंत येऊन तेही चैतन्यमय करावयाचें. यांतील वाक्शक्तीच्या साह्यानें हें सर्व घडवून आणावयाचें. हा मुख्य वेदमार्ग आहे. कारण, वेद हा वाग्रूपच आहे. बुद्धीचा मार्ग यासच ज्ञानयोग अथवा आत्मार्पणरूप गीताशास्त्रोक्त भक्तिमार्ग म्हटले. बुद्धि हीं निश्चयरूपेणी आहे. आणि चित्परमाणुरूपजीव स्वतःच्या निश्चयानेंच जीवरूप आहे, म्हणूनच त्याच्या सर्व शरीरास आधार निश्चयाचाच आहे. त्यामुळे एका अत्यंत दृढ आणि बलवत्तर अशा निश्चयानें सर्व शरीर क्रमशः चैतन्यरूप करून टाकणे शक्य आहे. चतुर्विध मार्गाने वर गेलेला जीवच या निश्चयशक्तीनें आपलें सच्चिदानंद शक्तिरूपत्व टाकून मूळच्या केवल्य स्थितींत पोहोंचू शकतो. परंतु निश्चयाचा मार्ग कोट्यवधि लोकांतून एकाद्या- सच आक्रमण करितां येईल. असेंच राजयोग व कर्मयोग हेहि अनेक प्रकारांनी परिस्थितीवर अवलंबून असल्यामुळे सर्व जीवांस त्यांचा सामान्य उपयोग होणें कठीण. म्हणून ऋषींनीं वेदांच्या आधारावर जो मार्ग काढून दिला तोच हा वर्णाश्रम धर्म होय. याला सामुग्री फारच थोडी, म्हणजे केवळ वर्णविहित असा आचार आणि वेदपठण एवढीच पुरते. या वेदमार्गाचे आद्यतत्त्व एक- मेवाद्वितीयम् ' हें असल्यामुळे साहजीकच त्याचा प्रतिसिद्धांत असा निघतो कीं, जीव हा विश्वांत एकटा नसून विश्वाचा एक अविभाज्य, नित्यसंबद्ध असा अंगरूप अवयवच आहे. म्हणून जीव आणि विश्व, - मग तें इंद्रियगोचर स्थूल विश्व असो, अथवा सूक्ष्म विश्व असो, - हे परस्पराश्रयी आहेत. आणि त्यांना 6 ७ ९७