पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/१२१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१०० स्थित्यंतर. टाकून विश्वव्यापारास मदत करीत सगुण स्थितींत राहणें, हा ज्याच्या त्याच्या संकल्पाचा प्रश्न आहे. चित्तवृत्तीचा निरोध म्हणजे योग, हें लक्षण योगाच्या पूर्णतेचें नसून योगस्थितीस कोठून खरोखर सुरुवात होते, त्याचें द्योतक आहे; व या लक्षणापर्यंतचे सारे प्रयत्न म्हणजे योग नसून योगाची पूर्वतयारी होय. आतां अशी एक शंका येणे साहजिक आहे की जरी प्राणाशिवाय इतर मार्गानें जाणारा मनुष्य असला, आणि त्यानें नाडीशुद्धी वगैरे सर्व गोष्टी दुसऱ्या एकाद्या मार्गानें केल्या, तरी क्रमशः सर्व शरीर जेव्हां तो ताब्यांत घेईल तेव्हां प्राण देखील त्याच्या ताब्यांत येईल; आणि विशिष्ट कोणाच्याही बिंदूंवर स्थिरता झाली असतां मनासह प्राणही स्थिर होणारच. म्हणजे अनपेक्षित रीतीनें कां होईना मार्गस्थ असतां, निरोध परि- णाम सहज घडून येईल. म्हणजे मार्गात केव्हां ना केव्हां तरी ताटस्थ्य येई- लच. असली स्थिति साधकांना केव्हां ना केव्हां तरी कदाचित् कोणच्याही मार्गांत येतच असेल. परंतु तिच्या आहारी पडून राहणे, अथवा निजनिधारानें ती क्षणमात्रांत जिरवून टाकणें हें ज्याच्या त्याच्या विमलज्ञानावर, निश्चय- शक्तीवर, भाग्यावर, आणि ईश्वरी कृपेवर अवलंबून राहील. पांच सात वर्ष जेव्हां अगदी मौनच स्थितींत अण्णासाहेब हे असत, आणि डोक्यावर पाणी पडलें तरी देखील सर्व शरीरांतील प्राण गोळा होऊन येत, अशी त्यांची स्थिती असे, त्या वेळेला, वस्तुतः असाच प्रसंग वारंवार येत असून, आपल्या कार्याकरितां निर्विकल्पक अत्यानंदाचा मोह देखील निर्धारानें दाबून टाकून, ही दशा कोणाच्याही लक्षांत न येऊं देतां, त्यांनी जिरवून टाकली, अशी जर एकाद्यानें कल्पना केली, तर त्यालाहां कांहीं खुळ्यांतच काढतां येणार नाहीं. असो. या सर्वांस धरूनच अशी जिज्ञासा होते कीं जरी अण्णासाहेब यांचा उलट मार्ग असला, तरी त्या मार्गाच्या पद्धतीप्रमाणे का होईना, त्यांनी काय केले असावें ? हा प्रश्न तर अधिकच बिकट आहे. एकदां ते असें म्हणाले होतें कीं, ‘ मागेंही पुष्कळ झाले, आणि पुष्कळ पुढेही होतील, परंतु महाराज आहेत आणि यच्चयावत् प्रत्येक गोष्ट त्यांच्या इच्छेनेंच होते, असे मला जसें पटलें, तसॆ दुसऱ्या कोणासही पटले नसेल. परंतु तें उगाच. पटले नाही,