पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/१३०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

शरणागतीचा निश्चयरूप मार्ग. . अण्णासाहेब यांनी मात्र भानूस हांक मारून तें कवठ आत्तां परत नेऊन टाक ' म्हणून सांगितलें; अण्णासाहेब यांस बरें वाटलें. १०९. ' आत्तांच्या आणि जेव्हां त्यानें तसें केलें, तेव्हांच आपण तुमच्याबरोबर असून दुसऱ्याची वस्तु विचारल्याशिवाय घेऊं देत होतों, म्हणजे तुमच्या चौरीस अनुमोदन देत होतों, म्हणून महाराजांनी मला सावध केले' असे त्यांनी सांगितलें !. यावरून अशा लोकांच्या अंतःकरणाच्या नाजुकपणाची कांही कल्पना येईल. विवेकानंद यांच्याविषयी त्यांच्या प्रिय शिष्यिणीनें असे लिहिले आहे की, 'देश- हिताची उकळी, आणि आत्यंतिक आत्मनिवेदनाची लहर यांच्या झगड्यांत सांप- डून त्यांचे अखेरपर्यंत मोठे हाल झाले. ' अशाच तऱ्हेचा परंतु याहीपेक्षां अतीशय तीव्र असा ताप अण्णासाहेबास झाला असावा. अनेक साधनांच्या नंतर गोडीगोडीनें ज्या स्थितीस प्रारंभ व्हावयाचा, त्या स्थितीस आत्मनिवेदनानेंच अण्णासाहेबांनी प्रारंभ केला. मांडणी दिसून म्हणा अगर इतर कांही रीतीने म्हणा, देशाच्या भवितव्यतेविषयीं आणि मार्गाविषयीं जें त्यांना समजलें, त्याच ज्ञानामिळती त्यांस एकप्रकारचें विशेष ज्ञानही झाले. भगवंताच्या लोकक्षयकृत् कराल दंष्ट्रांत अठरा अक्षौहिणी गडप होऊन जाणार, हें ज्ञान देणारें किश्वरूप पाहण्याबरोबरच अर्जुनास एक विशेष ज्ञानही झालें, आणि त्यानेंच खरोखर तो युद्धास प्रवृत्त झाला. एरवी नुसत्या श्रीकृष्णाच्या कुशल पांडित्यानेही त्याचे मन वळलें नाहीं. तें जें विशेष ज्ञान त्याला झालें, तेंच 'ईश्वरः सर्व भूतांनां ' आणि 'मामेक शरणं वज्र' वगैरे उपदेशरूपाने भगवान् वेदव्यासांनी मांडून ठेवलें. म्हणजे त्यांच्या लक्षांत असें आलें कीं, 'म्हणोनी ईश्वरू गोसावी । तेणें प्रकृती ही नेमावी ।' असे आहे. असे विशेष ज्ञान होऊन त्याच्या कर्तृत्वभाव- नेची कंबर मोडली गेली आणि त्याचबरोबर 'मनबुद्धीवाचा अंग । देऊनिया शरण रीघ ।' अशी शरणागति सुरू झाली. असाच प्रकार श्रीअण्णासाहेब यांचा कांही झाला असावा; आणि याच निश्वयानें बुद्धीस आकळून ते आपल्या मार्गास लागले, व हळू हळू या निश्वयाची भावना सर्व शरीरास बसून त्यांचें. शरीर म्हणजे 'मनबुद्धी वाचा अंग' हें महाराजरूप झाले. याच्या जोडीस गायत्री, महाराजांचें नांव, आणि उपासनामंत्र, यांची त्यांनी जोड दिली. इतर

  • हाही एक अण्णासाहेबाबरोबर देवदर्शनास जाणारा मुलगा होता.