पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/१३५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

११४ श्रीमहाराजांचें निर्याण. " होतें. अशा स्थितींत आठ दहा दिवस गेल्यावर दत्तोवुवा परत येऊन पहातात तों महाराजांनी स्वतःस कोंडून घेतले असून, अन्नपानादि सर्व व्यवहार आठ दहा दिवस अगदीं वंद आहेत. तेव्हां 'तुम्ही असे कसें केले ? महाराजांनी म्हटले म्हणून काय झाले ?' अशा प्रकारचा मंडळीस ठपका देऊन, सर्वजण 'नको' 'नको, ' म्हणत असतां त्यांनी हट्टानें खोलीचें कुलूप काढले. आंत महाराज आसनस्थ होऊन कांहीं क्रिया करीत होते; आणि त्यांनी आंत वगैरे बाहेर काढली होती, असे म्हणतात. असे सांगतात कीं, एक महिना अशा रीतीनें राहून, साप कात टाकून देतो त्याप्रमाणे शरीराचें वार्धक्य काढून टाकण्याचा त्यांचा हेतु होता. तें काय असेल तें कोणी सांगावें ? परंतु दत्तोबुवांनीं दार उघडतांच महाराजांनी डोळे लाल केलें, आणि " तुला हा कारभार कोणी सांगितला १ असो, झालें तें झालें, आतां आम्हांस रहावयाचे नाहीं, विठ्ठल मंदिरांत नेऊन खालीं ठेवून द्या, म्हणून सांगितलें; आणि शरीर पूर्ववत् करून तसेच आसनस्थ मौनवृत्तीने टक- मक पहात बसले. या वेळीं श्वासदेखील बंद होता. त्यामुळे मंडळीस वाईटही वाटलें, आणि काय समजावें तेंही कळेना; म्हणजे आहेत कीं देहावसान झालें, हेंच ठरविण्याची पंचाइत पडली. तेव्हां त्यांच्या म्हणण्याप्रमाणे पालखींत बस- वून त्यांना विठ्ठल मंदिराच्या म्हणजे हल्लीच्या संस्थानाच्या सोप्यांत ठेवलें, आणि अण्णासाहेब यांस निरोप धाडला. लागवणकर वैद्यांस बरोबर घेऊन अण्णासाहेब आळंदीस गेले. त्यांना पाहिल्यावरोवर, हास्यमुद्रा करून कुस्तीच्या आविर्भावानें दंड थोपटून महाराज उगाच राहिले. परंतु त्यास न जुमानतां अण्णासाहेबांनी जवळ जाऊन पाय धरले, आणि ' हे काय मांडलें आहे ? चला हे सोडून द्या,' असे म्हणून चांदीच्या वाटीत दूध आणले होतें, तें तोंडास ‘प्याले पाहिजे, ' म्हणून सांगितले. तेव्हां मुकाट्यानें महाराजांनी दूध पिऊन टाकलें. श्वास वगैरे पुन्हा पूर्वनत् चालू झाला. कांही वेळानें लध्वीही झाली, परंतु मौन कायमच होतें, आणि अंगास हात लावून पाहतां, ताप आहे, असें दिसलें, त्यानंतर त्यांना तसेंच ठेवलें. दुसऱ्या दिवशीं अण्णासाहेबांच्या मुलीच्या मुलीचें बारसें असल्यामुळे, ' मी जाऊन येतो, ' असे सांगून त्या दिवशी सकाळी ते परत पुण्यास गेले. त्यानंतर मागें काय प्रकार झाला, हें कांहीं नक्की कळण्यास साधन नाही. परंतु ऐकिवांत असें लावून,