पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/१४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(७) ८ कोणचेंही काम म्हटलें कीं, त्याला अनेकांचें साह्य झाल्याखेरीज क चालेल ? या ग्रंथासही अनेकांचे अनेकप्रकाराने साह्य झाले आहे त्या सर्वांचा पृथक् निर्देश करणेही शक्य नाहीं. तरी पण ज्यांचा माझा मोठासा पूर्वपरि- चय नसतांही आपण होऊन कार्यप्रेमानें लेखक होण्याचें ज्यांनी पत्करिलें, मला स्वतःस ग्रंथ करण्यास प्रवृत्त करून, माझ्या तबीयतखोरपणामुळे होणारा त्रास सोसून व आपले सर्व व्यवसाय सांभाळूनही ग्रंथ, पुन्हा प्रत देखील करावी लागली नाहीं इतक्या शुद्ध आणि सुवाच्यपणाने मोठ्या दगदगीनें लिहून काढिला व इतकेंही करून पुनः स्वतः आपले नामानिराळेच राहिले. त्या रा. नरूभाऊंचे आभार कसे मानावेत ते समजत नाहीं. त्याचप्रमाणे ज्या कित्येक मित्रांनी प्रकाशनास आगाऊ लागणारें द्रव्यसाहाय्य करून मला कायमचा ऋणी करून ठेविला आहे त्यांचेही आभार मानावे तितके थोडेच आहेत. त्यांच्या साहाय्याखेरीज हा ग्रंथ बाहेर येणेच अशक्य होतें. रा० दिवाकरपंत तर या ग्रंथाचे प्रकाशकच आहेत; मननामोदाचे व्यासंगी लेखक रा० माधवराव भिडे यांनी प्रुफें तपासण्याचे काम निरपेक्षपणे करून आपला पुष्कळ वेळ मोडला; रा० बावासाहेब पटवर्धन यांनी आमच्या विनंती- प्रमाणें एक प्रकरणच लिहून दिले; रा० बाबासाहेब विद्वंस यांनी चित्रे कर- ण्याकरितां श्रीअण्णासाहेब यांचा व रा० देव यांनी श्रीमंत तात्यासाहेब रायरीकर यांचा फोटो देण्याची मेहेरबानी केली; गणेश प्रिंटिंगचे सेक्रेटरी गोखले, म्यानेजर व इतरही मंडळी यांनी हा केवळ धंद्याचा प्रश्न न समजतां आपलेपणानें हैं काम मोठ्या तडकाफडकी करून दिले व प्रो. सहस्रबुद्धे पूना लीथोवर्क्सचे मालक, यांनीही मनाप्रमाणे चित्रे काढून दिली याबद्दल मी या सर्वांचा व त्याचप्रमाणे रा. सदाशिवराव बापट, रा. नरहर गणेश वाडेकर, भागवतभक्त कृष्णाजी वामन तळवळकर यांचाही प्रत्यक्ष अप्रत्यक्ष अशा सर्व तऱ्हेच्या मदती करितां मी मनःपूर्वक आभारी आहे. सौ० भागीरथीबाई बापट यांचा माझा अल्पस्वल्पही परिचय नाही. परंतु त्यांच्या सुंदर पुष्प- माळे' चा परिमळ जो या पुस्तकांत इतस्ततः दरवळलेला दिसतो त्याबद्दल त्यांचे आभार मानणें हें तर माझें कर्तव्यच आहे. ९ याप्रमाणे या ग्रंथाचा इतिहास आहे. अशा थोर व्यक्तींचें चरित्र क विशेषतः मतें वगैरे काम एकाद्या सामान्य माणसाकडे आलें म्हणजे ' शिष्या-