पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/१४७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कोटी दुर्वाचा संकल्प. टाकण्याकरितां, शिद्दयानें आपल्या हद्दीतील सर्व भट लोकांचें विजन करावयाचा हुकूम दिला. असे सांगतात की, या अनर्थांतून एक लहान मुलगा मात्र वांचला व त्याचे त्याच्या उपाध्यायांनी पालन पोषण केलें; आणि शेवटी मौंज. करून देऊन त्यास श्री गजाननाची उपासना दिली. तेव्हां आपल्या कुळाचें निसंतान करणाच्या मुसलमानांचा उच्छेद आपल्या हातून व्हावा, असा उद्देश मनांत धरून त्यानें फार उग्र तपस्या केली. त्याप्रमाणे, पुढे श्रीगजाननाचें दर्शन होऊन वरप्रसाद झाला कीं, “ हे काम तुझ्याच हातून पुढे होईल. व याच कुळांत तूं जन्म घेशील, परंतु आतां तपश्चर्या थांबवून वंशवृद्धि करावी.' व तेवढ्याकरितां, राज्य प्राप्ती झाली म्हणजे श्रीगजाननास एक कोटी दुर्वा अथर्वशीर्षाच्यासह वाहाव्या, असा संकल्प झाला होता. ही गोष्ट परंपरेनें बाळाजी विश्वनाथ यांस माहांत होती. पुढे भटांनी सिद्दीच्या राज्यांत पुन्हां देशमुखी मिळविली, व शिद्दधाच्या इतराजीनें आणि ब्रह्मद्रस्वामींच्या प्रोत्साह- नानें वाळाजीपंत घाटावर आला, वगैरे गोष्टी इतिहासप्रसिद्ध आहेत. राज्य- प्राप्ती झाल्यावर, हा संकल्प पुरा करावयाचा म्हणून बाळाजी विश्वनाथानें तें काम कायगांवकर सुप्रसिद्ध पाटणकरदीक्षित यांचेकडे दिले. त्याप्रमाणे, नाना- साहेब यांच्या कारकीदींपर्यंत सत्तावीस लक्ष दुर्वा वाहिल्याचा उल्लेख दीक्षितांचे पत्रांत सांपडतो. त्यानंतर राज्यवैभवाच्या गर्दीत, या कामाकडे पेशव्यांचें दुर्लक्ष झालें, व पुढें तें बंद पडून, वोलाफुलास गांठ म्हणतात त्याप्रमाणे, पानिपतचा प्रसंग होऊन त्यांच्या वैभवास उतरती कळाही लागली. असो. पटवर्धनांचेही कुलदैवत श्रीगजाननच आहे. आणि तेंच अण्णासाहेबांचे उपास्य असल्यामुळे या उत्सवावर त्यांचें अतीशय प्रेम होतें, आणि पुढील राजकीय वातावरणाच्या विकट परिस्थितीतही त्यांच्या प्रोत्साहनानें आणि वजनानें या उत्सवाचें रक्षण झाले हे प्रसिद्धच आहे. श्रीगजाननाच्या उत्सवानंतर पुण्यांत उपस्थित झालेली अनेक प्रकरणे, म्हणजे, हिंदुमुसलमानांचा दंगा, पंचहौद प्रकरण पुण्याची काँग्रेस, वगैरे सर्व गोष्टी प्रसिद्धच आहेत. जरी त्यांच्याशी अण्णासाहेबांचा अत्यंत निकट संबंध असला, किंबहुना त्यांतील कोणच्याना कोणच्या बाजूचें तरी सूत्रचालकच ते असले, तरीही 'न घरी शस्त्र करी असली त्यांची बाह्य स्थिति असलेमुळे, त्याविषयी जास्त लिहिणे योग्य होणार नाहीं. एवढे मात्र खास सांगतां येईल.