पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/१५१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अण्णासाहेबः साप्रदायाची सामान्य धात्री. १२९ सांगत असत. राममंदिरांत जातांच त्यांना ते सर्व पूर्वी पाहिल्याच्या खुणा तंतो- तंत पटल्या. त्यानंतर नित्याप्रमाणें फाल्गुनांत देहू आळंदी करून वुवासाहेब परत पुण्यास आले व मामुली प्रसाद होऊन धुळ्यास गेले. आळंदीसच आपण रहावें असा त्यांचा मनोदय होता परंतु महाराजांची आज्ञा नसल्याने त्यांना धुळ्यास जावे लागले. जाण्यापूर्वी आदल्या दिवशी रात्री सर्व निजानीज झाल्यावर त्यांनी अण्णासाहेब यांस " दादा, थोडा इकडे ये, " असे म्हणून हांक मारली, व त्यानंतर दोन अडीच तास त्यांचे भाषण झाले. या प्रसंगी वुवासाहेबांनी मोकळ्या मनाने आपला स्वतःचा इतिहास सांगून महाराजांनीं त्यांना हठयोगास कसें लाविलें, त्याच मार्गानें त्यांची पूर्णता कशी केली, वगैरे हकीगत व स्वतःच्या खासगी गोष्टीही सांगितल्या, म्हणून अण्णासाहेव सांगत. याच प्रसंगी 'आपण आतां जाणार, सांप्रदाय तुझीं चालवावा, ' असे म्हणून वुवासाहेवांनीं तें काम अण्णासाहेब यांचे गळ्यांत टाकलें व त्यासंबंधी कांहीं सूचनाही देऊन ठेवल्या. स्वतः अण्णासाहेब एवढी गोष्ट सांगत नसत. परंतु ज्या वेळेला या गोष्टी झाल्या, त्याच वेळी मधल्या माडींत नानासाहेब जागे होते, त्यांनी बहुतेक भाषण ऐकलें. जरी अण्णा- साहेब ही गोष्ट सांगत नसत, तरी पुढील पंधरा वर्षांत त्यांचे एकंदर वर्तन पाहिलें म्हणजे सर्व सांप्रदायिकांची ते एक " सामान्यधात्रीच " होते, असेंच कोणासही वाटेल. वुवासाहेबांनी दिलेल्या सूचनांतील एक विशेष सूचना अशी होती म्हणतात की, " सर्व सांप्रदायिकांना उपासना व ध्याना- दिक साम्य मार्गांनींच न्यावें, कारण लोक अनेक प्रकारांनी क्षीण झालेले असून हठयोगासारखे मार्ग आक्रमिण्याची, अथवा मार्गास लावल्यास तडीस लावण्याची पात्रता कोठेही आढळत नाही. " स्वतः बुवासाहेब हे हठयोग पद्धतीनेंच जाणारे होते, व त्याच मार्गानें महाराजांनी त्यांच्या योगाची पूर्णता केली, असे सांगतात. महाराजांच्या सध्यां माहीत असलेल्या शिष्यांत हठयोग- मार्गानें गेलेले फक्त बुवासाहेवच होते, असे म्हणतात. मात्र हठयोग म्हणजे सामान्यतः लोक समजतात त्याप्रमाणे धूतीपूतीचा अगर हट्टानें देवाच्या दारीं धरणें घेण्याचा नव्हे; तर श्रीज्ञानेश्वरीच्या सहाव्या अध्यायांत श्रीज्ञानेश्वर 1