पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/१५३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

धुळ्याचा उत्सव. १३१ , असे. सर्व प्रवास बहुतकरून प्यासेंजरच्या तिसऱ्या वर्गानेंच होत असे. सेकंड क्लासमध्यें वसावयाचा त्यांना पुष्कळ आग्रह केला, कारण थर्ड क्लासच्या गर्दीत त्यांना अतिशय त्रास होत असे, व अतिशय अडचणींनीं एका आसनावर दहा दहा तास सारखे बसून काढावे लागत, पण त्यांचे एकच उत्तर ठरलेलें असे. ' सेकंड क्लासमध्ये बसावयास हरकत नाही, परंतु सी एकटा बसणार नाहीं, वसूं तर आपण सारेच बसूं, नाही तर आपला थर्ड क्लासच बरा. त्यांच्याबरोबर नेहमी ५११० माणसें असत. इतक्यांमुद्धां सेकंड क्लासमध्ये चसणें त्यांच्या सांपत्तिक स्थितीला शक्य नव्हतें, आणि दुसऱ्या कोणी तिकीट काढून देण्याची तर गोष्ट बोलायचीही सोय नव्हती; यामुळे अखेरपर्यंत असाच प्रवास त्यांना करावा लागे. माल या प्रवासामुळे व धुळ्याच्या यात्रेमुळे लोकांची एक अशी उत्तम सोय झाली कीं, साधारणतः आपल्या व्यवसायांत राहणारे अण्णासाहेब या प्रसंगी पुष्कळसे मोकळे सांपडून त्यांचे बोलणें रगड ऐकावयास सांपडे, व त्यांची वृत्तिही अत्यंत प्रसन्न असल्यामुळे विनोद, थट्टा, वगैरे सर्व प्रकार घडून आनंदाचा मोठा पूर येई. या ठिकाणी ते उपस्थित होणाऱ्या सर्व विषयांवर मोठ्या प्रसन्नतेनें तासचे तास बोलत असत, आणि ' बोलविता धनी ' महाराजच असल्यामुळे त्या ठिकाणी जें जें होई तें तें सर्व हरिकीर्तनच आहे असे प्रत्यक्ष शिकविण्याकरितां बहुतकरून शेवटीं 'पुंड- लीक वरदे हरिविठ्ठल' करून जयजयकार करीत. या अमृतधारेंत दिवसभर ● राहिल्यामुळे धुळ्याच्या कडक उन्हाळ्याचा भासही होत नसे, आणि बहुतेक वेळ त्यांच्या आनंदमय सहवासांत जादूनें भारल्याप्रमाणे काढून कलिंगड्यांची व आंब्यां ची सारखी झोड उडविल्यावर, रात्री थोडा वेळ शीतळ चांदण्यांत बर्गाच्यांत शांतपणें पडलें असतां, दिवसांच्या सर्व आठवणी होऊन आणि त्या पुण्य- मूर्तीचे वारंवार स्मरण होऊन, जो भाव अंतःकरणांत उत्पन्न होई, व ज्या कांही अपूर्व सुखाचा लाभ क्षणमात अंतःकरणास • होई, त्याचे वर्णन कोणी करावें ? व कांही केले तरी तसा अनुभव आतां येणें दैवीं नाहीं, म्हणून त्याच जागी आतां कित्येकांस जो खेद होत असेल तो तरी कोणीं सांगावा ? जवळ जवळ अशीच किंबहुना थोडीशी जास्त स्थिति आळंदीसही होत असे. स्वतः अण्णासाहेब यांचा मात्र हा सर्व व्यवहार चार यात्रेकरूंप्रमाणेच आपणही, अशा रीतीने त्यांच्यांत मिळून मिसळून व हंसून खेळून होत असे. असो..