पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/१५४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पुढील आयुष्य. बुवासाहेबांच्या निर्याणानंतर दुसऱ्याच वर्षी श्रीपादस्वामीही समाधिस्थ झाले. यांची समाधी पुण्यास ओंकारेश्वरावर आहे. तेथेंच ते कांही दिवस राहत असत. त्या पूर्वी ते सदाशिव पेठेंत अण्णासाहेब यांच्या सासुरवाडी दामले यांचे येथे राहत असत. तेथून त्यांचा व अण्णासाहेब यांचा चांगलाच लोभ जडला. यांची हकीगत अण्णासाहेब अशी सांगत कीं अगदी लहानपणी एका जिवावरील दुखण्यांत त्या काळच्या समजुतीप्रमाणे यांना संन्यास दिला गेला; व त्या तोडग्यानें हे बरेही पण झाले. त्यावेळी त्यांचें वय सुमारें १८ वर्षांचें होतें. त्यानंतर त्यांनींही भानगडींत न पडतां आश्रमधर्म संभाळून कट- कडीत रीतीनें आयुष्य काढलें, परंतु नुसत्या आचारधर्मांतील शुष्कपणानें त्यांचें समाधान होईना, आणि ईश्वरानुग्रहाचा ओलावाही प्रगट होईना. अशी स्थिति दुःसह होऊन एकदोन वेळां त्यांनी आत्महत्या करण्याचाही प्रयत्न केला. यांचे शरीर व रूप चांगले असल्याकारणानें त्यांच्यावर एकदोन वेळां विषप्रयोगही केले गेले. परंतु इतक्या सर्वांतून कांहींना कांहीं चमत्कारिक रीतीनें ते वांचले, व पुढे त्यांची आणि महाराजांची गांठ पडली. चांगले पात्र पाहिले की सदेव भावाचा भुकेला असलेल्याच्या तोंडास पाणी सुटावयाचेंच. तसेंच येथेंही झालें, व महाराजांनी त्यांना मार्गाला लाविलें. महाराजांच्या नेहमींच्या पद्धतीप्रमाणे त्यांनी स्वतःची विशेष माहिती अशी श्रीपादस्वामींना केव्हांही दिली नाही. दोन संन्याशांचा स्नेह असावा, त्याचप्रमाणे सहज भाषणाच्या ओघांत श्रीपादस्वामींना ' तुमची इच्छा काय आहे' म्हणून विचारलें. आपण कोणा विशेष विभूतीशीं बोलतों आहों याची श्रीपादस्वामींना कल्पनाही नसल्यामुळे एकाद्या जिव्हा- ळ्याच्या वडील माणसाजवळ हृद्गत सांगावें, त्याप्रमाणे त्यांनी सांगि- तलें की " ज्याप्रमाणे नामदेवास श्रीपांडुरंगाचें सान्निध्य असें, त्याप्रमाणें श्रीदत्तप्रभूंचा प्रत्यक्ष सहवास असावा असे वाटतें, परंतु तें कोठून नशीबी असणार ? " असे म्हणून ते थोडेसे कष्टी झाले. तेव्हां स्वामींनी त्यांना सांगितलें कीं “ आम्ही हिमालयावर गुरूचे आश्रमांत असतां सहज कित्येक गोष्टींनीं कान वाटत होते, परंतु आमचा स्वभाव हा असा, छंदीफंदी पडल्या- मुळे आमच्या हातून कांही घडणें शक्य नव्हतें. त्यावेळी जेणे करून श्रीदत्ता- त्रयांचा साक्षात् सहवास होईल, असा मंत्र गुरूंनीं सांगून ठेवला होता. आमच्या हातून तर झालें नाहीं, परंतु तुम्ही कराल असे वाटतें. तुमचा १३२