पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/१५६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

● १३४ पुढील आयुष्य. मुलगी ही एकामागून एक वारल्यामुळे तर त्यांच्या घराला यथार्थपणे एकाद्या आश्रमाचे स्वरूप आलें. पत्नीच्या मृत्युसंबंधानें त्यांनी स्वतःच दोन ठिकाणी लिहून ठेविलें आहे. माझ्या बायकोला ( दामले कुलोत्पन्न रमा इला ) आषाढ शु॥ १० मंगळ- वार रोजी ज्वर फार आला ( १५ । ७ । १९०२ कर्के ४ दिने ) व अति- सार झाला. शुक्रवारी अतिसार व वांति फार झाली, परंतु पहाटेंस म्ह० उजाडता शनिवार सर्व कमी झाली व घायाळ होऊन गेली, व मोठ्यानें पहाटेंस एकवार उसासा येऊन ओरडून उठली, व निश्चेष्ट पडली. दुसरे दिवशीं सावध झाल्यावर तिनें सांगितले की नेण्याकरतां मंगळवारपासून चार दिवस मंडळी आली, व खाली झोपाळ्यावर बसत होते. परंतु श्रीस्वामी हातांत सोटा घेऊन मजजवळ बसत असल्यामुळे ते लोक अंगास हात लावीत नसत. शुक्रवारी जेव्हां ते लोक मान धरून ओहूं लागले, तेव्हां स्वामींनीं सोटा त्यांना मारला, व ते पळून गेले, पुन्हा आले नाहीत. श्रीस्वामी दिवाणखान्याचे सज्ज्यांत हिंडताहेतसें दिसलें. आषाढ शु| पौर्णिमा रविवार ता० २० । ७। १९०२, रोजी मी सुंदरलाल, वागलू इत्यादि श्री- आळंदीस गेलों. कर्के भौमे व॥ ९ दिने ( २९ | ७ | १९०२ ) प्रातः सुमारें ८ । ३० वाजतां बायको श्रीचरणीं स्वानंदी गेली. घराबाहेर नेण्यापूर्वी सुंदर- लाल व विनायक आठवले यांनीं फोटो काढले, व वागलूनें गोठ्याकडे बोला- वून नेऊन सांगितलें कीं चार आण्यांचा हार आणवून श्रीमहाराजांची पूजा करा. त्यावरून लक्ष्मण आपट्याकडून पूजा केली, प्रेत नंतर नेलें, " "( याच प्रसंगाला जोडून एक चमत्कारिक योगायोग झालेला त्यांनी लिहिला आहे. “ रा. माधवराव दांडेकर हे जुन्नरास जूनचे आरंभापासून कमळाक हरी साठे बी. ए. यांचे येथें जाऊन राहिले होते. तेथे त्यांनी ता० २५ । ७ १९०२चे सुमारास स्वप्नांत पाहिले की स्वामीमहाराज आमचे ओट्यावर उभे आहेत, व खालीं रस्त्यावर एक ब्राह्मण दर्भ हातांत घेऊन उभा आहे. त्यास महाराज बोलले कीं " येथें तुमचें काम नाही, हें मनुष्य आमचें आहे, याची क्रिया सांगणें वगैरे सर्व आमचेकडे आहे. " तरी तो उभा राहिलेला मनुष्य जाईना. तेव्हां महाराजांनी त्यास धक्के मारून घालविला, व आंत येऊन झोंपाळ्यावर बसले. ही गोष्ट त्यांनी कमळाकराचे आई वगैरेपाशीं दुसरे