पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/१५८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१३६ पुढील आयुष्य. असे खरोखर त्याचें वय नव्हते. परंतु अण्णासाहेब यांना मुद्दाम एकीकडे बोला- वून नेऊन त्याने सांगितलें कीं, “ चार आण्यांचा हार आणून आधी महाराजांची पूजा करा, आणि मग इतर गोष्टी करा " हे खरोखरच चमत्कारिक आहे. अशाच त्याच्या एक दोन गोष्टी आण्णासाहेव सांगत. एकदां चौकांतील झोपाळ्यावर आण्णासाहेब व इतर कांही मंडळी बसली होती, "आणि श्रीगुरु. चरित्र या ग्रंथाची सायंदेवाच्या घराण्यांतून अस्सल प्रत मिळवावी व तो ग्रंथ शुद्ध करावा, कारण त्याच्यामध्ये अशुद्धं वरींच झालेली आहेत, ” अशी वाटाघाट चालली होती. जवळच चौकाचें दाराशी असलेल्या घडवंचीवर बागलू ऊर्फ टग्या बसलेला होता. त्यावेळेस त्याची मुंजही झालेली नव्हती. दोन पाय हालवीत कांही तरी नादांत बसलेल्या त्या नागव्या पोरास या विषयांत लक्ष लागावें असें कांहींच नव्हतें, व त्याचे महत्त्वही कळणे शक्य नव्हतें. त्यानें तें भाषण नीट लक्ष देऊन ऐकले किंवा नाहीं तें सांगतां येत नाहीं, परंतु मंडळींच्या भाषणांत या कामाकरितां अण्णासाहेब यांनी गाणगापुरास जावें असें ठरून, जेव्हां अण्णासाहेबानीं कबूल केलें, तेव्हां या बावळट मूर्तीच्या तोंडून असे शब्द निघाले कीं, दारू आणि माती एका ठिकाणी करून पेटविली, तर दारू जळून जाते, आणि माती खालीं रहाते. " आपण ग्रंथ वाचावा, महाराजांचे शब्द असतील ते काम करतील, बाकीचे नुसते वाचले गेले म्हणून काय नुकसान झालें ? असा त्यांचा आशय होता. इतके शब्द उच्चारून स्वारी तेथून पळून गेली. मात्र अण्णासाहेब यांच्या लक्षांत तो प्रकार आला, व त्या सूचनेप्रमाणे त्यांनी पुढे तो बेत सोडून दिला. प्रासादिक ग्रंथासंबंधी तसा विचार फिरून केव्हांही त्यांच्या डोक्यांत आला नाहीं. ते अशीच गोष्ट धुळ्यास घडली. वुवासाहेबांच्या पहिल्या पुण्यतिथीस अण्णा- साहेब गेले तेव्हां बागलूही बरोबर होताच. रीतीप्रमाणे प्रसाद घेण्यापूर्वी अण्णासाहेब यांनी समाधीपुढें कांही रक्कम ठेविली. परंतु आळंदीस महाराजां- पुढे ठेवीत त्यापेक्षां ती रक्कम कमी होती. बुवासाहेबांचा अधिकार मोठा असून वस्तुतः आळंदी, धुळे आणि पुणे, या तीनही स्थळी एकच देवत नांदतें, असा लोकांस धडा शिकवावा, म्हणून म्हणा किंवा इतर कांही कारणाने म्हणा, दुसऱ्या दिवशीं पहाटेंस जागे झाल्यावर अण्णासाहेबांकडे येऊन बागल सांगूं