पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/१५९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्रीमहाराज कशानें बोलू लागतील. १३७ लागला की, आतां वुवासाहेब' माझ्याजवळ आले होते, व म्हणूं लागले कीं, आळंदीस अमूक रक्कम ठेवतां, येथेंही तीच ठेवीत जा. ' या वेळी देखील त्याचे वय ५१६ वर्षांचेंच होतें, आणि अण्णासाहेबांच्या व्यवहाराकडे लक्ष जाण्याचेंही कारण नव्हते. " 66 असेच एकदां रा. माधवराव मोडक आणि अण्णासाहेब तांग्यांत बसून आळं- दीस जात असतां मोडकांनी अण्णासाहेवास विचारलें कीं, काय केले म्हणजे महाराज बोलू लागतील ? " तेव्हां यानेंच एकदम उत्तर दिलें कीं 'सकाळी जेवून राम नारायण किंवा महाराज असले कांहीं नांव मुखाने घ्यावें, म्हणजे • महाराज बोलूं लागतील. मात्र नांव मनांत घ्यावें म्हणजे बरें. " यावरून मांड- • कांनाही अतिशय आश्चर्य वाटलें, आणि 'त्यावरून आपण त्यांना प्रज्ञावर्धन स्तोत्राची हकीकत सांगून महाराजांच्या अस्तित्वाची खात्री करून दिली, व दुसरे दिवशीं स्वतःच्या हाताने त्याची एक प्रतही करून दिली, लिहून ठेवले आहे. असो. ११ म्हणून त्यांनी मद्रासेस जाण्यापूर्वीपासूनच पत्नीशी यांचा संसारसंबंध जवळजवळ तुट- •ल्यासारखाच झाला होता. तेव्हां सौ. रमाबाईच्या जाण्यानें यांच्या आयुष्यक्रमांत कांहीं विशेष फरक झाला, असे मुळींच नाहीं. मात्र कुटुंबाचा सर्व गाडा हांक- ण्याचे काम यांच्या मुलीवरच येऊन पडले. सुमारें सात वर्षे तें शक्य तितक्या उत्तमरीतीनें करून ती थोर आणि उदार अंतःकरणाची स्त्रीही यांना सोडून गेली. मात्र एक झालें कीं, त्यापूर्वी थोडे दिवसच बाबासाहेब यांचे लग्न होऊन सून घरांत आली होती. बाबासाहेब यांचे त्यावेळच्या रीतीप्रमाणें व पटवर्ध- नांच्या घराण्यास साजेलशा रीतीनें पूर्वीच लग्न होऊन जावयाचें, व त्याप्रमाणें नानासाहेबांनी पुष्कळ अट्टाहासही केला; परंतु काय कारण असेल तें असो, अण्णासाहेब यांनी ही गोष्ट केव्हांही मनावर घेतली नाहीं. बाबांची आई तर त्याच्या लग्नाविषयीं तडफड करतांकरतांच मरून गेली. ' याचें लग्न तुमच्या हातून होणार नाही' असे अण्णासाहेबास उद्वेगानें म्हणण्यापलीकडे तिच्या हातांत कांहींच नव्हतें. परंतु नानासाहेब घरांत कर्तेसवर्ते होते, आणि त्यांचा बाबासाहेबांवर जीवही होता. किंबहुना बाबासाहेबास जन्म मात्र अण्णासाहे- बांनी दिला, परंतु त्यांचे सर्वप्रकारें संवर्धन नानासाहेब यांनीच केले. त्यामुळे अर्थातच मुलगा एवढा वाढून एल्. एल्. बी. झाला, तरी त्याच्या लग्नास