पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/१६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

॥ श्री ॥ श्री० दादासाहेब खापर्डे यांचे ' चार शब्द : " -~ वैकुंठवासी श्रीअण्णासाहेब पटवर्धन यांच्या चरित्रासंबंधी चार शब्द: लिहिण्याचा सुयोग मला आला हैं मी माझें महद्भाग्य समजतों. श्रीगीतेतील ' स्थितप्रज्ञ ' वगैरे संज्ञा आणि भगवंतांनी त्यांच्या केलेल्या व्याख्या माझ्या वाचण्यांत आल्यापासून त्यांत दर्शविल्याप्रमाणें तंतोतंत वागणारा मूर्तिमान् पुरुष पहावयास मिळावा असे मला वाटत होतें. आणि गीता वाचणाऱ्या पुष्कळांनाही असेच वाटत असेल. सुदैवानें श्रीअण्णासाहेब यांच्याशी माझा. स्नेह जडला व ही माझी इच्छा पूर्ण झाली. मला त्यांचे प्रथम दर्शन मुंबईस मुरारजी गोकुळदासचे चाळींत सन १८७७१. ७८ चे सुमारास घडलें. तेथपासून त्यांचें सर्व वर्तन पहावयास सांपडून माझी खात्री झाली कीं, श्रीकृष्णांनीं ' स्थितप्रज्ञ ' इ. पुरुषांचें जें वर्णन केले आहे तें श्रीअण्णासाहेबांना तंतोतंत लागू पडते. याची जाणीव जसजशी वाढत गेली तसतशी त्यांच्याविषयीची माझी प्रेमभक्तिही वाढत गेली. त्यांच्याकडे केव्हाही पहा, योगवासिष्ठांत वसिष्ठांनी श्रीरामांना सांगितल्याप्रमाणें ' अंतस्त्यागी बहिः संगी० एवं विहर राघव ' इत्यादि सूत्ररूप वाक्य सर्व प्रसंगांत, सर्वकाळ, सर्व- ठिकाणी जणूं काय ते स्वतःच्या वर्तनानें लावून दाखवीत आहेत व अशा रीतीने जणूं काय मुकाट्यानें जगताला बोधच करीत आहेत असे वाटे. त्यांच्या स्वभ वांतील दुसरा विशेष असा की, अंतर्यामी अशा रीतीनें पूर्णपणें अभिमानशून्य असतांही, मन्वादि ग्रंथांत ब्राह्मणांनी आपला वर्णाश्रमधर्म कसा आचरावा या विषयीं जें सांगितलें आहे तें हल्लीच्या स्थितीतही कसें आचरावें तें त्यांनी अत्यंत स्वाभिमानतेनें दाखविलें. अगदीं वर वर पहाणाऱ्यालाही त्यांच्या ठिकाणच्या २३ गोष्टींचें आश्चर्य वाटल्यावांचून रहात नसे. अलौकिक बुद्धिमत्ता, धर्मशास्त्र ( Law ) आणि वैद्यक ( medicine ) यांच्यांत पारंगतता असल्यामुळे त्यांना अगणित द्रव्य प्राप्त करून घेतां आले असते. परंतु वैराग्य धारण करून त्यांनी त्याच्या-