पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/१६७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

रा० ब० गणेश व्यंकटेश जोशी. १४५ कासें ठरलेल्या शिस्तींत चालावयाची, त्यांत गव्हर्नरच्चा एकाद्या विनंतिपासून तो घरचीच्या आग्रहापर्यंत कांहीही असो, खंड म्हणून पडावयाचा नाही. व्यासंगाकरितांच व्यासंग करावयाचा, अशी विद्येची खरी गोडी आणि लौकि- काचा तिटकारा, हीं स्वभावतःच यांचे ठिकाणी असल्यामुळे, सतत इतका दीर्घोद्योग करूनही, जवळ जवळ अखेरपर्यंत यांची योग्यता कोणासही उमगली नाहीं. जें शुद्ध बुद्धीला पटेल तेंच करावयाचें असा यांचा धारा होता. एकदां पटलेली गोष्ट धरून ठेवण्याची चिकाटी जितकी जबरदस्त, तितकीच एकादी गोष्ट बुद्धीला पटणेंही कठीण होतें. असा हा नामदार गोखल्यांचा गुरु त्या वेळच्या मवाळ पक्षांचा एक मोठा जोर होता. नुकतेंच यांनी पेन्शन घेतलें होतें, व उरलेले आयुष्य मोकळ्या हातानें देशकार्याला देऊन टाकण्याचा त्यांचा विचार होता. जर हे त्याच वेळीं मवाळ पक्षास मिळते, तर कदाचित् तो पक्ष इतका लेमळा बनला नसता, कारण मवाळच तर काय पण जहाल पक्षांतीलही ज्वलत्जहालांनीं मान खाली घालावी, एवढ़ें सत्कर्म धैर्य जोशीबुवांच्या अंगी होतें. मवाळ पक्षाविषयी लोकांत जो अनादर होता, तो पुष्कळसा त्यांच्या मताच्या युक्तायुक्ततेमुळे नसून मवाळ लोकांच्या ठिकाणी जो कर्मधैर्याचा अभाव दिसून येई, त्यामुळेच होता. अशा स्थितीत ती मतें उचलून धरणारा व कोणासही खोडतां येणार नाही असाच शब्द नेहमी तोंडांतून काढणारा, जोशीबुवांसारखा पुढारी त्यांना मिळता, तर त्या पक्षाला चांगले दिवस आले असते, असे वाटतें. जोशीबुवा जहाल पक्षाकडे आल्यावर कलेक्टरकडून त्यांना ते पेन्शनदार असल्याची जाणीव करून देण्यांत आली होती. त्यावेळी जोशी- बुवांनी असा ठोक जवाब दिला होता की, “ज्या दिवशी सरकारी नौकरी तून मोकळा झालों, त्या दिवशींच कुटुंबासही एक प्रकारें राजीनामा दिला आहे. एकट्याचा माझा कांहीच प्रश्न नाहीं. पेन्शनची यत्किंचितही प्रतिष्ठा नाही. त्याची आठवण देऊन मला वळविण्याचा प्रयत्न करणे व्यर्थ आहे. सरकारास वाटेल तर तें खुशाल बंद करण्यांत यावें ! " असो. यांचा व अण्णासाहेब यांचा तसा लौकिक परिचय पूर्वीपासूनच होता, व अण्णासाहेब हे जरी सर्व तऱ्हेनें त्यांना विचित्र वाटत असले, तरीही त्यांच्या मनांत अण्णासाहेब यांच्याविषयीं आदरही होता. यापलीकडे १०