पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/१७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(२) चर लाथ मारली. इतकेच नाहीं तर गुप्तरूपानें अथवा कांहीं व्यावहारिक मिषानें कोणीं कांहीं देण्याचें मनांत आणिलें असतां त्याचा घरांत नुसता प्रवेशही न होऊं देतां भीष्मांप्रमाणें कठोरपणानें व्रतपालन केलें. वरें इतकेंही असून त्यांचा गर्भश्रीमंती बाणा आपला नेहमी कायमच होता. कोणी कांहीं मागावयास आला आणि त्यांनी त्याची अवहेलना केली असे एकही उदाहरण सांपडावयाचें नाहीं इतकेंच तर काय पण बोलण्यांत, चालण्यांत, अथवा इतर कोणत्याही व्यवहारांत नुसता त्रासिकपणाही कधीं पहाण्यांत आला नाहीं. सर्व गोष्टी ऐकून घेत, सर्वांशी अतिशय प्रेमानें वागत आणि योग्य सल्ला किंवा मदत देत. त्यामुळे पुण्याचेंच तर काय पण महाराष्ट्रांतील सर्व प्रकारच्या लोकांचें ते एक मायपोटच झाले होतें. ' दया करणें जें पुत्रासी । तेची दासा आणि दासी' अशी ती भगवंतमूर्ति होती । G त्यांच्या अलोलुप्त्वाप्रमाणेंच त्यांची कर्मनिरतताही अद्भुतच होती. केव्हांही पहा ते आपले उद्योगांत असावयाचे. आपल्याचे व परक्याचे हा तर तेथे भेदच नव्हता. परंतु काम म्हटले की मग तेथे लहान मोठे असाही प्रश्न "नव्हता. सारी कामें सारख्याच कळकळीनें व अवंचकतेनें व्हावयाचीं. इतकेंच तर काय पण धनलुब्ध सावकार जशी नित्य द्रव्याची शिल्लक पहातो आणि ती वाढविण्याची तजवीज ठेवतो त्याचप्रमाणे सदाचारनिष्ठ श्रीअण्णासाहेवही आपल्या जपतपांची रोजकीर्द ठेवीत होते असे म्हटले तरी चालेल, त्याच्या- प्रमाणेच काम पडल्यास ते ५१५ दिवसांनीही आपल्या साऱ्या नित्यकर्माच्या हिशोबाची मिळवणी करीत ! आपल्या सर्व व्यवहारांतील पूर्वपरंपरा रक्षण करण्याकडे त्यांचे फार बारीक लक्ष असे, घरांतील सामानसुमान, वस्त्रपात्र, किंवा उठण्या बसण्याच्या रीति येथपासून तो थेट राजकारणापर्यंत सर्व गोष्टीत ते आपली जुनी परंपरा पाळीत. आणि त्यांत विशेष गोष्ट अशी कीं, अशा परंपरा पाळण्यामुळे त्यांचें कोठें उणेंही पडले नाहीं. अशा त्यांच्या अनेक गोष्टींची आठवण होते. ही आठवण जिवंत ठेवून जशीच्या तशीच पुढील पिढ्यांच्या स्वाधीन करण्याकरितां चरित्ररूपानें ग्रथित करणे आवश्यकच होतें. अशा व्रम्हर्षि महापुरुषाचे चरण ही पुष्पांजली देण्याची संधी मला आली याबद्दल मी जो आनंद व्यक्त केला आहे तो अनाठायीं नाहीं असे ग्रंथ वाच