पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/१७२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१५० पुढील आयुष्य. दिवस अण्णासाहेब यांचा शाळा तपासावयाचा असे. अण्णासाहेब त्या शाळेत गेले व शाळा तपासल्यावर मुलींना सुट्टी देऊन त्या मास्तरणीशी : तिला पगार काय मिळतो, ' ' घरी माणसे कोण कोण, ' वगैरे गोष्टी बोलत नसले; तेव्हां तिलाही जरा नवलच वाटलें. नंतर 'तुमचें वय काय ? म्हणून अण्णासाहेब यांनी विचारले व तें कळल्यावर ' तर मग तुम्ही अजून चाहेर बसतां?' असा प्रश्न विचारला. याचा संदर्भ कळणे शक्य नसल्या- मुळे तिनेंही मोठा अविर्भाव आणून ' मी याचें उत्तर देत नाहीं. आपण असले अयोग्य प्रश्न विचारतां म्हणून मी तक्रार करीन' असे सांगितलें, व भाषाही थोडी उर्मटच वापरली. त्यांवर अण्णासाहेब यांनींही शांतपणें सांगि- तलें कीं ' हा प्रश्न मी खाजगी रीतीनें विचारीत नसून म्युनिसिपालिटीचा अधिकारी या नात्याने विचारीत आहे. तुम्ही सरळ जबाब ग दिलांत तर मला लेखी घ्यावा लागेल इतकेंच. ' तेव्हां तिनेही नरम होऊन ' असें या प्रश्नाचें काय काम पडलें' म्हणून विचारले. अण्णासाहेब यांनी सांगितलें कीं “ शहरांतील पुष्कळ ब्राह्मणांकडून अशी तक्रार आली आहे कीं, शाळेत मास्तरिणी अस्पर्श लसतांच शिकवितात. त्यामुळे घरीं दारों विटाळ कालवून मोठी पंचाईत होते. मुलींना शाळेत कसे पाठवावें ? या प्रश्राचा विचार कर- ण्याकरितां मी ही चौकशी करीत आहे. तुम्ही अस्पर्श असतां लपवूं नका. तुम्हांस तीन दिवस रजा मिळण्याची सोय केली जाईल. असो. 6 म्युनिसिपालिटींत असतांना लेव्हीचीं वगैरे आमंत्रण त्यांना नेहमीं येत, व फार क्वचित ते एखादे वेळीं जातही. या लेव्हीच्या आमंत्रणाची एक मोठी मौजेची गोष्ट ते सांगत.

  • एकदां दुपारी सुमारें एक वाजतां श्रीविष्णूला जाण्याकरितां ते दारांत उभे

होते. ऊन कडक पडले होतें, व ऐन माध्याह्न असलेमुळे जिकडे तिकडे साम- सूम होतें. इतक्यांत एक गृहस्थ मोठ्या घाईनें त्या ठिकाणी आला. त्याच्या पोषाखावरून तो सुस्थितींतला असावा असे दिसत होते. उन्हांत हिंडल्याने त्याचा चेहरा सुकून गेला होता, व त्याची मुद्रा मोठ्या फिकिरींत पडल्यासारखी दिसत होती. अण्णासाहेब यांना दारांत पाहिल्यांबराबर त्यानें नमस्कार केला, व तो तसाच पुढे निघाला. पण तितक्यांत त्याच्या मनांत काय आलें कोण जाणे.