पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/१८६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आंथरूण घातलें. १६३ लेली असेल, तेथें पहिलीच एकादशी केली पाहिजे, असा उपदेश करीत. यावरूनहि खऱ्या खोट्याचा वाद नेहमींच चाले. तशाच प्रकारची हीहि थट्टा असेल असे पहिल्यांदा वाटले परंतु प्रत्यक्ष त्यांना दाळवांगें खातांना पाहून · मात्र सर्वांना मोठे आश्चर्य वाटले. तथापि त्यांत कांही विशेष आहे असें कांही वाटलें नाहीं. आतां मागाहून मात्र त्यादिवशीं महाराजांच्या येथे त्यांनी चतुर्थांव्रत मुद्दाम उजवून घेतलें अशी कल्पना मनांत येते. खरें काय असेल कोणी सांगावें ? यानंतर पुनः त्यांनी आळंदीस भोजनच तर काय पण फराळही केला नाहीं आणि खरोखर खाणें त्याच दिवसापासून बंद झालें, प्लेगच्या रोग्यांस थोडेसे बरे वाटतांच गाडींत घालून स्वतः त्यांनी पुण्यास आणिले व आपल्या घरीच ठेविले. उत्सवानंतर श्री० अण्णासाहेब यांचेकडे व्हावयाचा प्रसा- दही अर्थातच लांबून धुळेकर मंडळींचाहि मुक्काम लांवला होता. त्यांतच प्लेगचे रोगी, त्यांची नातेवाईक मंडळी, यांची भर पडून घरी एकच गर्दी उडून गेली होती व स्वतः श्री० अण्णासाहेब आपल्या शरपंजर स्थितींतही अखेरपर्यंत जातीनिशी त्यांची व्यवस्था करीत होते. त्यांतच बोधानंद भारती यांचेंही काम त्यांच्यामार्गे होतेंच. पौष वद्य ११ स रात्री त्यांनीं श्रीभक्त माधवराव गडवोले, सिताराम- पंत दांडेकर इत्यादिकांच्या बरोबर फराळ केला. तेथपावेतों त्याची प्रकृति नादुरुस्त असल्याची शंका त्यांनी कोणास येऊं दिली नाहीं; परंतु दुसरे दिवशीं शौच्याहून आल्यावर लापशी पुढे नेतांच ‘आतां देऊं नकोस. माझी प्रकृति अतिशय वाईट आहे. मी थोडासा पडतों.' असे म्हणून त्यांनी आंग टाकिलें व तेथपासून दोन तीन दिवस सारे व्यवहार बहुतेक पडू- नच करीत होते. सुंदरलाल डॉक्टरवर त्यांचा मोठा लोभ होता. त्यांनीहि येऊन बराच आग्रह केला तेव्हां त्यांचें औषध घेतों म्हणून कबूल केले. श्री० अण्णासाहेब यांच्या सहवासानें सुंदरलालहि देशी औषधे वापरूं लागले होते. त्यांनी अशी कल्पना काढिली की पोटांत जंत असावेत व जंताचें औषध देतो म्हणून आग्रह धरिला; परंतु औषध घेतल्यानें जंत मरतील म्हणून औषध घेण्याचे त्यांनी साफ नाकारले. परंतु एरंडेलाचा जुलाच घेण्याचें क़बूस करून गुरुवारी घेतों म्हणून सांगितलें. हात पहाणें, कोणाशी कांही