पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/१८९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

निर्याण. उद्यांच कशाला जातोस' म्हणून त्यांच्याशी मात्र बोलले. मध्यंतरी कै. ति० गं० भा० गयाताईंनीं स्वतःहि बोलण्याची खटपट करून पाहिली तरीदेखील कांहीं उपयोग झाला नाही. अशा स्थितींत १० दिवस गेले. यांना बरेच दिवसापासून थोडासा कफाचा विकार होता व त्यांच्या खान- पानादि एकंदर शरीरधर्माच्या मानानें लघवीसहि थोडें जास्तच जावें लागे. उभे राहण्याची शक्ती नसल्यामुळे पाटावर बसवून उचलून गच्चीवर न्यावे लागे, कारण दिवाणखान्यांत कांहीं तरी घेऊन लघवीस बसणें त्यांना संमत नव्हतें. इतकेंच तर काय पण कफामुळे वरचेवर थुंकावें लागे तें देखील त्यांनी शक्ती होती तोपर्यंत उठून बसून खिडकींतून थुंकावें. जेव्हां वारंवार उठण्याची शक्ती राहिली नाही तेव्हां त्यांनी अजीबात थुंकणेंच टाकून दिलें. गच्चीवर नेलें असतां काय होईल तेवढेच. एरव्ही कितीहि आग्रह केला तरी नुसते तस्तांत थुंक- ण्याचेंहि कबूल कटरीनात. महाराजांचें नांव घेणे मात्र अखंड चालूच होतें. शेवटी मंगळवारचा दिवस उजाडला व 'आज आतां दूध प्यावयास हर- कत नाहीं, १० दिवस झालें;' अशी गोविंदबुवांनी आठवण दिली. तेव्हां मात्र चिडून त्यांच्यावर रागावले व ' हो कबूल केले आहे, मी घेतों' असे म्हणून त्यांनी एक मेझर ग्लास आणविला व मोजून एक औंसभर दूध घेतले. त्याच रात्र त्यांना अतिशय घामहि सुटला तेव्हां भस्म आणि सुंठीची पूड एकत्र करून अंगास चोळावयास सांगितले. परंतु चोळणाऱ्याच्या हलगर्जीपणामुळे ती अव्यवस्थित रितीनें वाटेल तशी चोळली जाऊन उलट त्यांच्या अंगाची फार आग झाली व त्यांना बराच त्रासहि झाला. बुधवारचे दिवशीं त्यांनीं मेझर ग्लासनें मोजून २ औंस दूध घेतलें व कडुनिंबाचा पाला काढून आंगावर टाकण्यास सांगितलें; आणि गुरुवारी तर त्याचप्रमाणे ३ औंस दूध घेऊन दिवसभर निंबाचे पाल्यांतपडून राहिले. तेव्हां भयंकर क्षीणता दिसत असतांही आतां हे उठण्याच्या मार्गास लागले असा भ्रम मंडळींत उत्पन्न झाला. गुरुवारी संध्याकाळी सुंदरलाल आहे कीं गेला म्हणून मुद्दाम चौकशी केली व त्यांनी दिलेला काढा औषधे आणून 'आतांचें आतां तयार कर रहणून सांगितलें आणि थोड्या वेळानें औषधें आणिली कां म्हणून चौकशी करून ' काढा कोळशावर कर, नाही तर स्टोव्हवर करशील' असे बजाविलें. त्यावरून तर सर्वांना इतकी आशा उत्पन्न झाली कीं, आतां चारदोन दिवसां-