पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/१९४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

' साक्षात्परिचय ' सा केतकीपत्नसुगौरमूर्तिः । साकेतकेशस्य यशःप्रपूर्तिः ॥ संकेतरेखा नवभारतस्य । दृशां नराणां कृतकृत्यतेव ॥ श्रीअण्णासाहेब यांच्या चरित्रांतील सामान्य गोष्टींचें आतांपर्यंत निरूपण झाले. त्यामुळे अण्णासाहेव यांच्याविषयी त्यांच्या प्रत्यक्ष व्यक्तीची अशी सर्व माहिती मिळावी, अशी इच्छा वाचकांस होणे साहजिकच आहे; म्हणजे अण्णासाहेब यांचा खाजगी आयुष्यक्रम कसा होता, कुटुंबसुख अथवा सांसा- रिक इतर सुखे यांची अनुकूलता त्यांस कशी होती, त्यांचा त्यांनी उपभोग कितपत घेतला, व कसा घेतला, ते कसे राहत, कसे वागत, कसे बोलत, इत- केंच नाहीं, तर काय खात, काय पांघरीत, कोणाशी कसे वागत, इत्यादि- बारीकसारीक गोष्टी देखील मोठ्या मनोवेधक व बोधप्रद असतील, असें वाचकांस वाटणे, व त्या माहितीकरितां त्यांची जिज्ञासा जागृत होणें, साह- जिकच आहे. आणि त्याप्रमाणे त्या गोष्टी तशाच आहेतही. थोर पुरुषांच्या चरित्रांतील विशेष हाच असतो की, त्यांच्या आयुष्यांतील मोठमोठ्या गोष्टी- पेक्षांही लहानसहान प्रसंग व असल्या बारीकसारीक गोष्टीच अधिक मनो- रंजक व बोधप्रद असतात. श्रीअण्णासाहेब यांच्या संबंधींही अशीच गोष्ट. आहे. त्यांच्या संबंधीचे सर्वच कांहीं विलक्षण, परंतु कांहीतरी विशेष शिक्षण देणारें असें; परंतु बॉस्वेलचें शहाणपण अंगी नसल्यामुळे या संबंधाची जिज्ञासा फारच अल्पप्रमाणानें पुरी करितां येईल, याचेंच वाईट वाटतें, असो. अगदी प्रारंभीच सांगितले आहे की, यांचा वर्ण कागदी निंबासारखा सु- गौर असून भव्य व बळकट होता. आधींच कांतिमान् शरीर, त्यांतः गर्भश्रीमंतींत रुळलेले, त्यांत सर्व तऱ्हेच्या अव्याहतप्रभुत्वाचें विलक्षण राज- तेज त्याच्यावर खेळून राहिलेलें, व त्यांतच दया' ज्ञान आणि शांति यांची