पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/२०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्रीअण्णासाहेब पटवर्धन यांचें चरित्र. बाल्य. ध्यायेत् सिंहगतं विनायकममुं दिग्वाहुमाद्ये युगे त्रेतायां तु मयूरवाहनममुं षड्वाहुकं सिद्धिदम् । द्वापारे तु गजाननं युगभुजं रक्तांगरागं विभुं तुर्ये तु द्विभुजं सितांगरुचिरं सर्वार्थदं सर्वदा ॥ - श्रीगणेशपुराण. ॥ श्री ॥ श्री अण्णासाहेब यांचे घराणे मूळचेंच सरदारी बाण्याचें. परंतु ते महाराष्ट्री सरदार असे कधीच नव्हतें. कोंकणांत पेशव्यांच्या आरमाराचे अधिपति धुळप म्हणून होते, त्यांचे पदरी अण्णासाहेबांचे पूर्वज फडणिशीचे कामावर होते. अण्णासाहेबांचे तीर्थरूप रामचंद्र भाऊसाहेब, त्यांचे वडील धोंडदेव, व त्यांचे वडील अनंत. त्यांचेविषयीं अशी आख्यायिका आहे की ते फार कडक व निस्पृह असत. एकदां धुळप पेशव्यांना भेटावयास आले असता त्यांचे बरोबर अनंतराव होते. पेशव्यांनी धुळप यांचा जो सन्मान केला त्यामुळे नाना फडणिसांना वैषम्य वाटून त्यांनी धुळपांचा अपमान व्हावा, असें वर्तन केले. त्याबरोबर अनंतराव यांना तें सहन न होऊन त्यांनी दरवारांतच त्यांना सांगितलें कीं " पेशवाईचें नशीब फुटलें ! चाकराचें शौर्य व वैभव जेथें धन्याला सहन होत नाही, तेथें नौकरी करणें पाप होय ! त्यांनी नौकरी सोडली. असो. " असे म्हणून भाऊसाहेब यांची थोरली बहीण पुण्यास प्रसिद्ध असलेल्या रामचंद्र नाइ- कांचे येथें दिली होती. शनिवारवाड्याजवळच परांजपे यांचा वाडा आहे.