पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/२०७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

थट्टेखोरपणा व लीनता. १८३ कशीही समजूत त्यांनी कधीं खोडून न काढतां, ती कितीही चुकीची असली तरी त्याची पाठ थोपटूनच कांहीं तरी खुबीने तिला योग्य त्या वळणावर आणून सोडावे. विरवल बादशहाच्या गोष्टीतील विरवलाप्रमाणे, दुसऱ्याच्या समजुतीची रेषा न खोडतांच स्वल्प करून टाकण्याची त्यांची हातोटी अवर्ण- नीय होता. त्यांचा बुद्धिभेद तर होणार नाहीं. आपले महत्त्व तर कांही विशेष रीतीनें त्यांच्यापाशीं वाढणार नाहीं, आणि सहजरीतीने फार मोठी गोष्ट त्याला साधावी, अशा रीतीनें ते बोलत. ज्यांना जग जोड्यापाशींही उभे कर- णार नाही असला अनन्वितपणा करणारेही त्यांच्यापाशी अगदी आप्तभावानें आपला पोटडकला करीत, व तें ऐकून, जरी ते अंतःकरणांत अगदी दुःखी झालेले दिसत, तरी देखील त्यांनी कधीं तिरस्कार अथवा क्रोध दाखवून त्याचा पाणउतारा केला नाहीं; ' उलट झाले तें झालें, महाराज फार दयाळु आहेत, त्यांची प्रार्थना करा,' असे आश्वासन देऊन त्यांना मार्गाला लावण्याचा प्रयत्न करीत. त्यांचा मूळ स्वभाव बराचसा थट्टेखोर असल्यामुळे संबंधांतल्या लो- कांची व सामान्यत्वें इतरांचीही कित्येक गोष्टीबद्दल पुष्कळ चेष्टा करीत; परंतु त्यांतही त्यांचें एक धोरण असे. कोणाही व्यक्तीच्या व्यक्तिविषयक अवगुणा- बद्दल त्यांच्या तोंडून कधीं अवाक्षरही निघालें नाहीं. ज्या सामाजिक व राष्ट्रीय अवगुणांनी देशाचा अधःपात होत असलेला पाहून त्यांचे अंतःकरण तुटे, अशा सामान्य गुणापुरताच ते व्यक्तिविषयक टाका करीत. त्या टीकेच्या योगानें त्या अवगुणाविषयीं तिटकारा उत्पन्न व्हावा, परंतु ती व्यक्ति मात्र निंद्य ठरूं नये, इतक्या नाजूक धोरणाने ते उपहास करीत, अथवा क्रोध, नापसंती वगैरे दाखवीत; आणि यामुळेच सर्व दर्जाच्या आणि सर्वं तऱ्हेच्या लोकांचा यांच्याशी विचित्र संग्रह होता. एकाद्या विषयावर आपल्यास कांही विशेष माहिती आहे, असे ते कधींच दाखवीत नसत, व अगदी साध्या रीतीनें सहज कांहीं समजलेले दुसन्यास सांगावें, अशा रीतीनें सांगत. त्यामुळे त्यांच्या भाषणांत मोठेमोठे पारिभाषिक शब्द व इतर ग्रंथांचा उल्लेख कधींही येत नसे. मुद्दाम एकाद्या ग्रंथाचा, लेख- काचा, अगर पारिभाषिक शब्दाचाच विषय असेल, तर गोष्ट वेगळी; एरवीं ग्रंथांच्या आधारानें अगर पारिभाषिक शब्दांच्या गर्दीने आपले विद्वत्त्व त्यांनी कधीं दाखविलें नाहीं. पारिभाषिक शद्वांनी योतित होणाऱ्या कल्पना ऐकणा- A