पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/२०८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

6 १८४ साक्षात्परिचय ' राच्या मनांत जशा रीतीनें सहज उत्पन्न होतील, अशाच रीतीनें फोडून सांगत. सांगतांना विषयाशी तादात्म्य होऊन तदनुरूप अंगविक्षेप करण्याची त्यांना संवय होती. या सर्व गोष्टींमुळे तासच्या तास भाषण ऐकत असतांही ऐकणा- प्यास तहान भूक आठवत नसे. ऐकणाराला शक्य तेवढे त्याविषयोंचे कळावें अशा विषयींच्या त्यांच्या कळकळीमुळे शिक्षक अथवा व्याख्याते यांना त्यानें मात्र त्यांची स्थिति चमत्कारिक होती. एखादी गोष्ट निघाली म्हणजे ती तिच्या मूलतत्त्वांसह त्यांनी शिकवाव- यास जावें, व त्यांच्या बहुश्धि व्यापांमुळे विचारणाऱ्याला अभिप्रेत असलेल्या मुद्दयाला हात लागतो न लागतो तोच मधें कांहींतरी निघून तें भाषण तसेंच राहून जावें, असेंच बहुतेक होई, व त्यामुळे त्या विषयाची समग्र माहिती तर राहूनच जाई परंतु तात्पुरती जी काय हवी असे, तीहि मिळत नसे. परंतु त्यांत एक लाभही मोठाच होत असे; असल्या प्रसंगी इतर कित्येक विषयांचा संबंध आनुषंगानें येई, व त्याविषयीं जातां जातां, जे कांहीं मोठे- मोठे सिद्धांत अगदीच साध्या भाषेत परंतु थोडक्यांत ते चटचट बोलून जात, त्यामुळे विचारशक्तीला अनेक अंकुर फुटत, व अनेक प्रश्नांवर नवीन उजेड पडत असे. एकाच ऐकण्यांत बहुश्रुततेचा फायदा मिळून विस्तृतता व व्याप- कता यांची ज्ञानास जोड मिळे. एकदां त्यांना रा. देवल यांनी उपस्थित केलेल्या गायन शास्त्रांतील श्रुतींच्या संख्येच्या वादाविषयों प्रश्न केला होता. त्याच्या वरून आर्यशास्त्राप्रमाणें श्रुति बावीसच, व त्या बावीस असणेंच कां अवश्य आहे, असे सांगतांना त्यांनी मनुष्याच्या शरीराची रचना, ध्वनीचा व पाठीच्या कण्याचा संबंध, वगैरे सांगण्याकरितां Anatomy चे पुस्तक काढून उपक्रम केला. सुमारे अर्धा पाऊण तासांतच कांहीं तरी अडथळा येऊन तो विषय तितकाच राहिला; परंतु एक मात्र त्यामुळे फायदा झाला, कीं, श्रीगुरु- चरित्रांतील रावणाचा गानयोग व त्यांतील रागरसांचें उत्पत्तिस्थान व रंगरूप, हैं कांहीतरी थोतांड नसून विशेष परिभाषेत सांगितलेले शास्त्रीय सत्य आहे, एवढा मात्र बोध झाला. असें नेहमींच होई. यावरून एका गोष्टीचा सहज उलगडा होतो. वैद्य शास्त्रांतील त्यांचें अपूर्व ज्ञान त्यांनी जवळच्या लोकांस शिकविलें नाहीं, असा त्यांचेवर एक आक्षेप येतो. तो किती वृथा आहे, हे यावरून समजून येईल. आपलें ज्ञान