पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/२०९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मोठा गहन विषयही थोडक्यांत सांगण्याची हातोटी. १८५ दुसऱ्यास द्यावें, याची तर त्यांना अशी कळकळ होती कीं तशा तऱ्हेचा "प्रसंग आला असतां, ते तो कधींही वाया जाऊं देत नसत. इतकेच नाहीं, तर ऐकणारा कंटाळा करून टाळाटाळ करीत असतांही पाठीमागे लागून त्याला सांगत. परंतु त्याचा उपयोग न होण्याचे कारण इतकेंच की अशा गुरूपाशीं विद्या शिकण्यास जी कांहीं पूर्व तयारी लागते, ती जवळ असलेली माणसे त्यांच्याभोवती कोणीच नव्हती. प्राथमिक शिक्षणांत आणि एम्. ए. सारख्या उच्च शिक्षणामधें जो फरक आहे, तोच याही प्रसंगी अवश्य होता. प्राथमिक 'शिक्षण घेणाराला शाळेत जातांना पाटीपेन्सिली पलीकडे वरोवर कांहींच न्यावे लागत नाही. तेथील शिक्षकाचें कार्यक्षेत्र छोटेसें असल्यामुळे विद्यार्थ्याची सर्व तयारी तो स्वतः करून घेऊं शकतो. परंतु उच्च शिक्षणाचा व्याप फार मोठा असल्यामुळे तेथील शिक्षक प्राथमिक शिक्षण या नात्यानेही जरी कितीही उत्तम असला तरी मुळापासून विद्यार्थ्यांची तयारी करून घेण्यास त्याला सव- डच नसते. म्हणून तेथें विषयाची सारी तयारी विद्यार्थ्यानेच करावयाची असते, ● आणि अशा त्यांच्या चेतलेल्या बुद्धीत शिक्षकाने फक्त पूर्णाहूति द्यावयाची असते. त्याचप्रमाणे येथेही होतें. अण्णासाहेब यांच्याजवळून वैद्यशास्त्राचा फायदा मिळण्यास त्यांच्याजवळ येणारा मनुष्य, आर्यवैद्यक आणि आग्लवैद्यक या दोघांचेही चांगलेच ज्ञान असलेला, व त्यामुळे त्या शास्त्रांसंबंधीची मार्मिक स्थळे ओळखून, आपण होऊन शंका विचारणारा असा हवा होता; म्हणजे त्याचा फायदा झाला असता. त्यांना थोडक्यांत कोणचा विषय सांगतांच येत नव्हता, असे कांहीं नाहीं; उलट अति थोडक्या शब्दांत वेदांत व अध्यात्मविद्या यांची रहस्यें देखील सुबोध रीतीनें सांगण्याची त्यांच्यासारखी हातोटी कोठेंच आढळत नाहीं. परंतु ते ऐकणारावर अवळंवून असे. ' एकदां वैराग्य म्हणजे काय ? ' असा प्रश्न निधाला असतां, फार थोडक्यांत त्यांनी असे चट्कन सांगितले, की " वैराग्य" म्हणजे “ आग्रह नसणे " वैराग्याची इतकी स्वल्प व संपूर्ण व्याख्या कोठेही आढळावयाची नाही. त्याचप्रमाणें ध्यानाविषयीं एकदां विषय 'निघाला असता त्यांनी असेच सांगितले की " ध्यान म्हणजे खरोखर काय, तर 'शरीराच्या कणाकणांत फांकून गेलेले चैतन्य गोळा करून स्थिर करणे." या थोड्याशा शब्दांत सांगितलेल्या लक्षणांनीं ध्यानपद्धती विषयींचा साराच