पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/२१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२ अण्णासाहेबांचे तीर्थरूप, - भाऊसाहेब तेथें भाऊसाहेब लहान असतांनाच आले. त्यावेळी ते वाड्यांत कित्येक वेळां जात असत. पर्वणी वगैरेंना जेवावयासही जात. पेशवाई गेली तेव्हां यांचें वय सुमारें १८ वर्षांचे होतें. म्हणजे त्या वेळच्या मानानें कार्यक्षम असें होतें. पेशवाईच्या माध्याहीचीं माणसें त्यांनी पाहिली होती. बारभाईंचीं कारस्थानें खेळणारी माणसें त्यांच्या परिचयाची होती. खर्चाच्या रणांगणांत निजामाला स्वारी भरणारे अमृतराव जाखडे त्यांचे स्नेही होते, आणि बाळाजीपंता- सारख्या नराधमानें ब्राह्मणी सत्तेचा झेंडा आपल्या हातानें उतरून इंग्रज-सर- कारचें निशाण तेथें लावलेले त्यांनी आपल्या डोळ्यांनी पाहिलें होतें. पेश- वाईच्या अखेरचा नीचपणा, त्यावेळच्या इंग्रजांचे सौजन्य आणि शील, सर्व राष्ट्राच्या अवनतीचें पाप इतिहासानें ज्याच्या एकट्याच्या माथीं मारलें तो दुर्दैवी बाजीराव पेशवा, कोथरूडच्या रस्त्यावर पेशव्यांच्या स्वारीची तास तास वाट पाहत बसणारा, व 'कर्सेही करून आमची वर्दी पोहोचवाच ' म्हणून चोपदारांची मनधरणी करणारा, आणि त्यांनी " अंग्रेजका वकील खडा है, निगा रखो महाराज !” असे म्हटल्यावर, गुडघे टेंकून बसलेल्या त्याचेकडे वांकडी मान करून श्रीमंतांनी रुकार दिला की मिळविली, असें मानणारा एल्फिन्स्टन, आणि पेशवाईनंतर स्वराज्याच्या जिवंत आठवणीनें रात्रंदिवस जळणाच्या मराठे सरदारांची अंतःकरणें आपल्या गोड शब्दांनी आणि दिलदार परंतु खोल अशा वर्तनानें हळू हळू थंडगार करून, त्यांच्या मिशांचे पीळ कायमचे उतरून ठेवणारे धोरणी इंग्रज अधिकारी, - - हे त्यांच्या आयुष्याचे पूर्वरंग होते. स्वराज्याच्या उतारावरून वैभवाच्या समुद्राकडे जोरानें वहात जाणाऱ्या विविध शक्तींचा ओघ अशा रीतीनें बांध घालून एकाएकी तुंबवल्या- वर त्यांतील पाणी निरनिराळ्या रीतीनी चौफेर उधळून देऊन, इंग्रजी सत्तेची कृषी, इंग्रज मुत्सद्यांनी त्याच पाण्यावर किती खुबीदार रीतीनें सोळा आणे पिकवून घेतली, हे त्यांना उत्तररंगांत पहावयाचें होतें. परंतु या गोष्टीशी अण्णासाहेव यांचा प्रत्यक्ष संबंध थोडा असल्यामुळे, त्या उपसण्याचें काम इतिहासावर सोंपवून, आपण मूळ विषयापुरतेंच पाहूं. या अठरा आणे पिक- लेल्या शेतीतील मालाचे भारे, जेव्हां त्यांच्याकरतां रावणाऱ्या कुळंब्यांच्या घरांत न पढतां, विलायतेंतल्या पेवांत सोन्याच्या रूपानें साचूं लागले, तेव्हां हळूं हळूं कुळंब्यांचे डोळे कसे उघडले, आणि ते उघडल्यावर आपली चूक