पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/२१६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१९२ साक्षात्परिचय ' तेव्हां अशी मौज पहावयास सांपडली की लोकमान्यांनी ' हा अमुक भाग अथवा हें वाक्य किंवा शब्द काढले तर काय हरकत आहे ? म्हणून म्हणावें च 'अरे, तो मी अशा अशा करितां घातला आहे,' म्हणून त्यांतली खुवी अण्णासाहेबांनी सांगावी. तेव्हां लोकमाल्यांनीच म्हणावें की 'हो हें तर खरेंच!' अशा रीतीनें कांही वेळ गेल्यावर लोकमान्यांनी अण्णासाहेबांस सांगितले की हें तर सर्व खरें आहे. परंतु कसेही करून हे संक्षिप्त करून द्या.' तेव्हां ‘ माझी कांही हरकत नाहीं, तुझ्या सोईला येईल तसे करून घे' असे अण्णा- साहेबांनी सांगितलें, व त्याप्रमाणें पुढे लोकमान्यांनीच त्यांत फेरफार करून, अण्णासाहेबांचा आवाज लहान असल्यामुळे, अण्णासाहेबांच्या चिरंजीवांनी तें परिषदेपुढे वाचलें. अण्णासाहेब यांच्या दीर्घसूत्रीपणामध्ये विशेष लक्षांत ठेवण्याजोगती एक गोष्ट चटकन् दिसून येई. ती ही कीं इतर लोकांप्रमाणें हलगर्जीपणा, आळस, अथवा कमकुवतपणा असल्या कोणत्याही कारणानें तो घडत नसून त्यांच्या सर्व गोष्टींप्रमाणे त्यांतही एक प्रकारचा पद्धतशीरपणा होता. कोणचीही गोष्ट करण्यामध्ये यत्किंचित् देखील चालढकलपणा करावयाचा नाही, प्रयत्नाची कसूर करावयाची नाहीं, अगर कितीही क्षुल्लक बाब दिसली तरी जास्त हुशा- रीनें उगीच घाई करावयाची नाही, उलट थोडा वेळ लागला व किहीही श्रम गैरसोय अथवा खर्च झाला, तरी एकाद्या नवशिक्या माणसाप्रमाणे ती अगदीं यथाक्रमच करावयाची असा त्यांचा स्वभावच असल्यामुळे, त्यांचे सर्व करणें पहिल्यापासूनच मोठें अघळपघळ असे. शरीरसुखाखेरीज इतर कोणत्याही बाबतीत संकोच म्हणून त्यांना ठाऊकच नव्हता, हे जरी खरें आहे, तरी त्यांचा स्वभाव कांहीं चिकट नव्हता; उलट चालण्यासारख्या साध्या गोष्टी- पासून तों मोठ्योट्या राजव्यवहारापर्यंत त्यांच्या अंगी सर्वकार्यात विलक्षण तडफे दिसून येई. त्यांना एकदां विचारले होते की ' हा दीर्घसूत्रीपणा तुमचा पूर्वीपासूनच आहे काय ? ' तेव्हां ते म्हणाले ‘छे, छे, तेव्हां असें करून कसे भागतें, रे, बाबा ? एकाच वेळी पन्नास कामें एकदम उरकण्याची शक्ति माणसास कां नाहीं, असें तेव्हां होऊन जाई ! ' यावरून दीर्घसूत्रीपण हा त्यांचा कांहीं मूळ स्वभाव नव्हे, हें दिसून येईल. आपले एक मुख्य धोरण सांभाळावयाचें, व इतरही कोणच्या गोष्टीस ' नाहीं' म्हणावयाचें नाहीं,