पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/२१७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

दीर्घसूत्रीपणा का धिमेपणा ? १९३ , अशा स्वभावामुळे हा दीर्घसूत्रीपणा उत्पन्न झाला. व त्यांतच यथाशास्त्र वागण्याच्या आवडीमुळे ज्योतिषशास्त्राची भर पहून अण्णासाहेब यांचें सर्व करणें म्हणजे पुण्याच्या लोकांस एक कौतुकाचा व थट्टेचाच विषय होऊन बसला. परंतु त्यांतही असे पाहण्यांत येई कीं, एकादी गोष्ट अमुक वेळीं अगर अमुक वेळांत करावयाची, असे त्यांनी ठरविलें, आणि तशी ती घडली नाहीं, असे कधींच झाले नाही. ती घडण्याच्या आड कधीं कांहीं आलें नाहीं. एरवीं माल दक्षिणायन, मृत्युयोग, राहुकाळ, वगैरे आड येत, आणि 'गंगा. धरशास्त्री हजर नाहीत, ' अगर 'अमुक माणसाला निरोप पाठविला आहे, अथवा ' एकाद्या पुस्तकाची अमुक सालचीच प्रत नाहीं, ' असल्या बारीक- सारीक गोष्टींवरही दोन दोन वर्षे काम अडून राही ! पूर्वी सांगितलेंच आहे कीं, कोणच्याही गोष्टीसंबंधीं ते आपल्या मनाशी चटदिशीं कांहीं तरी धोरण ठरवून टाकीत, व कोणी कांहीही केले तरी, त्यांत कधीं फरक करीन नसत. मात्र इतकेंच कीं, केवळ धर्मविरुद्ध असली गोष्ट खेरीज करूंन कसल्याही गोष्टीस 'नाही' म्हणण्याचा त्यांच्या वाणीला सरावच नव्हता. त्यामुळे नेहमीं ‘ हो हो, आत्तां करावयाचें, ' असें घोंकीत व माणसाला निरुत्साह न करतां त्याची जिज्ञासा व जोर हीं वाढती ठेवून ते सर्व कामें करीत, व त्यांतच आपली मुख्य धोरणेही अवाधितपणे पाळीत. करावयाची म्हणून कबूल केलेली गोष्ट करावयास कधीं चुकले नाहीत, परंतु त्यांच्याविषयीं इतका विचार करण्यास कोणाला सवड नसल्यामुळे ' काम करणार नाहीत, असें वाटे, व अधीरपणाने आम्ही त्यांच्या मागें लकडा लावावा. त्यामुळेच त्यांना विनाकारण अतिशय त्रास होई, व त्यांचें वर्तन अधिक तऱ्हेवाईक भासे. परंतु त्यांच्या सोशिकपणाची खरोखरच धन्य आहे. इतकेंही करून जानूच्या मुलांना पाठीवर खुशाल धिंगाणा घालूं देणाऱ्या तीन राक्षसांच्या गोष्टींतील जलौघाप्रमाणे त्यांच्या वृत्तीची प्रशांतवाहिता क्षणमात्रही चळली नाहीं, एवढे मात्र खरें कीं, या अलीकडील दीर्घसूत्रीपणाबद्दल ज्योतिषशास्त्र हें बरेंचसें जबाबदार आहे, व एका वक्त्यानें संभावित टवाळीनें म्हटल्या- प्रमाणे राहू निघून जात, १३ > आणि मृत्युयोग यांच्या कचाट्यांत सांपडून हेनेचे तरी त्यांना नुसता श्मश्रु करावयास वेळ नसे