पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/२१८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१९४ साक्षात्परिचय ' ही गोष्ट खरी आहे. खरोखरच त्यांना इमश्रू करण्यास मुहूर्त आणि वेळ वर्षां- तून एकादा दिवस मिळत असे, त्यामुळे त्यांची दाढी नेहमीच वाढलेली असे. अखेरची आठ नऊ वर्षे तर त्यांनी इमथ्रूच टाकून दिला असल्यामुळे, त्यांची दाढी चांगलीच वाहून त्यांच्या कांतिमान् गौर शरीरास शोभा देत असे. कामाच्या वांदलींत अस्ताव्यस्त झालेले पांढरें शुभ्र धोतर, चोळवटलेल्या कोवळ्या केळीच्या पानाप्रमाणें घड्या पडलेलें व खपाटीं गेलेले पातळ पोट, एकाच मानस सरोवरापासून निघालेल्या हिंदुस्तानच्या दोन वाजूच्या सिंधु ब्रम्हपुत्रांप्रमाणे हनुवटीवरील जाळ्यांतून निघालेल्या पांढऱ्या शुभ्र दाढीच्या दोन लांबच लांब सटा, दंडास बांधलेला अनंत, आणि गळ्यांतील रेशमी सूत्र, मधुर हास्य आणि सकौतुक दृष्टि, ज्ञान, दया, औदार्य इत्यादि गुणांचा प्रभाव, शांति क्षमा दया यांनी युक्त असे तपाचें तेज, आणि बलवीर्यतेची ऐट-इत्यादि लक्षणयुक्त अशी ती मूर्ति, लांच सडक बोटें लववून साभिनय भाषण करीत उभी असलेली पाहिली म्हणजे आयुर्वेदादि उपांगसंपन्न असा मूर्तिमंत ऋग्वेदच पुढे उभा आहे की काय, असें वाटे ! असो. ज्योतिष शास्त्रावर अण्णासाहेब यांचा विश्वास असल्याबद्दल वर सांगितल्याप्रमाणें संभावित रीतीनें त्यांची टवाळी अथवा जास्त बोचकपणानें त्यांची कीव केलेली पुष्कळ वेळां ऐकूं येते. परंतु यांतही विचार करण्यासारखी एक गोष्ट आहे. ज्योतिषशास्त्र - म्हणजे, फलज्योतिष -याविषयों अण्णासाहेब यांचा दृढविश्वास कितपत होता, हे सांगणे कठीण नाहीं. अनेक आर्यशास्त्रांप्रमाणे ज्योतिषशास्त्र हें एक शास्त्र आहे, अशी त्यांची समजूत होती. परंतु, त्याबरोबरच कांहीं झालें तरी तें जडशास्त्रच आहे, आणि इतर सर्व जडशास्त्रांप्रमाणेच त्याची कितीही वाढ झाली तरी, तें अपूर्णच राहणार, असे ते सांगत. एकदां त्यांना त्यांच्या स्वतःच्या कुंडली विषयींच प्रश्न केला होता. तेव्हां त्यांनी चटकन्, आला, त्यांची कुंडली कोण सांगणार ? ' असे उत्तर दिले. त्याचप्रमाणें चेहऱ्या- वरून, आंगठ्यावरून इतकेंच तर काय, पण नुसत्या आवाजावरून कुंडली मांड- ण्याची प्रतिज्ञा करणारे एक गर्गाचार्य त्यांचेकडे आले होते. त्यावेळच्या झालेल्या भाषणांतही त्यांनी असेच सांगितले की “ फलज्योतिष हे शास्त्र तसें ठीक आहे, परंतु तें पूर्ण शास्त्र होऊन तंतोतंत उतरणे शक्य नाहीं. नदीच्या प्रवाहाबरोबर वाहणाऱ्या लांकडाप्रमाणे नियतीच्या ओघांत वाहणाऱ्या जीवांसंबंधानें त्याचा उत्तम ‘ ज्यांच्या लाभांत गोविंद 6