पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/२२६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२०२ ' साक्षात्परिचय ' यानें घडवून आणण्याची ते खटपट करीत. अशा तऱ्हेचें एक लहानसें उदा- हरण आठवतें, त्यावरून निरभिमानता आणि कारुणिकता यांचा थोर पुरुषां- च्या ठिकाणी कसा मधुर संगम असतो, तें दिसून येईल. 6 त्यांच्या जवळील एका मुलाला श्मश्रु करावयाची होती. त्या दिवशी शनि- वार असून संकष्टी चतुर्थी होती. त्यालाही संकष्टी चतुर्थीचे व्रत होतें, परंतु ध्यानांत नसल्यामुळे न्हावी आल्याबरोबर त्यानें श्मश्रूचा बेत केला. त्यावेळी कांहीं विषयावर अण्णासाहेब बोलत असल्यामुळे त्याने दुसऱ्या एका गृहस्थास तुम्हीं वसा, मी आतांच येतों' म्हणून सांगितलें पोटांतला भाव असा की- अण्णासाहेब यांनी आपण होऊन भाषण थांबवावें. परंतु काही केल्या तें भाषण तर थांबलेंच नाहीं, पण उलट मारुतीच्या शेपटाप्रमाणे लांबतच चाललें. शेवटी हळूच पळता पाय काढावा म्हणून तो उठून उभा राहिला. परंतु त्यानेंही भाषण न थांबतां उलट तेही उठून उभे राहिले, व तशा उभ्या- उभ्याच तास दीड तास निघून गेला. शेवटीं खालचें काम सर्व आटोपून बराच वेळ कंटाळल्यावर न्हाव्याने हांक मारली. तेव्हां मात्र भीड तोडून 'आतां भी श्मश्रु करावयास जातों ' म्हणून त्यानें विनंति केली. तेव्हां 'बरें आहे' म्हणून तेही आपल्या उद्योगास लागले. इकडे स्मश्रु वगैरे आटोपल्या- वर स्नान करून दिवाणखान्यांत येत असतांना त्या दिवशीं चतुर्थी असल्याचें त्यास समजलें, तेव्हां 'आज चतुर्थी आहे आणि मी तर हजामत करविली, ' असें त्याने म्हटल्यावरून अण्णासाहेब म्हणाले 'माझ्या होतें ध्यानांत, आणि म्हणूनच मी बोलत उभा राहिलो. ' त्यानें विचारलें, ' मग तुम्ही तसे सांगितलें कां नाहीं ? ' ते म्हणाले, 'तुझा जरा विशेषच आग्रह दिसला कर ण्याचा, म्हणून मी बोललों नाही. ' तेव्हां आपली चूक लक्षांत येऊन त्या इसमालाही खेद झाला, व 'आम्हांला कुठलें येवढे धोरण असणार ? उघड उघड जर सांगितलें नाहीं, तर आम्हांला कधीही कळावयाचें नाहीं, असे आम्ही अडाणी आहों ' म्हणून त्यानें सांगितलें. तेव्हां त्याला वाईट वाटलेले पाहूनही त्यांचें अंतःकरणही थोडेंसें कळवळले व त्यांनी मृदुवाणीनें त्याचें समाधान केलें. ही गोष्ट दिसावयास क्षुल्लक आहे, तरी पण तिच्यावरून त्यांच्या वर्त नांतील कित्येक खुब्या समजून येतात. 'लोकोत्तर पुरुषांचा स्वभाव वज्राः पेक्षांही कठोर असून फुलापेक्षांही नाजूक असतो,' असें भवभूतीनें म्हटलें ६