पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/२२९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पराकाष्ठेचें अमानित्व. २०५. तरी अवाधित आहे, यांत शंका नाही. तेव्हां तें करणें तर अवश्यच आहे. परंतु त्या संस्कृतीला जोडून जी कांहीं मनोरचना लागटपणानें येते, अथवा ज्या मनोरचनेमुळेंच या संस्कृतीचा अहंनिर्विशेष आदर होतो, ती व वैदिक संस्कृतीत बीजभूत असलेली मनोरचना, या परस्पर स्वभावतःच भिन्न आहेत. तेव्हां बाहेरची परिस्थिति दुसऱ्या संस्कृतीस धरून, आणि आंतली संस्कृति मात्र वैदिक संस्कृतीस धरून व्हावयाची, असली अभूतपूर्व आपत्ति येऊन पडली आहे. अशा स्थितीत, विराधी बाह्य परिस्थितीनें अंतःसंस्कृतीला धक्का न बसतां तिची अवाधित वाढ कशी व्हावी, आणि बाह्य संस्कृतीला तिच्या लगामीं ठेवून, तिच्याकडून हुकमी काम कसे करून घ्यावें, हें अण्णासाहेब. यांच्या चरित्राचें सार आहे. त्यांच्या सर्व आयुष्याचा विचार केला तर सर्व तऱ्हेच्या विरोधांचे इतकें बेमालूम मिश्रण कोठेंच सांपडावयाचें नाहीं. दृष्टांत देऊन सांगावयाचें म्हणजे योगेश्वर कृष्ण आणि देवव्रत भीष्म या भारतीय दोन व्यक्तींच्या प्रकृतीचें जर मिश्रण करतां आलें, तर कसे काय साधेल, याचाच जणूं काय हा ब्रह्मदेवानें प्रयोग करून पाहिला. त्यांचा खाजगी आयुष्यक्रम पाहिला तर केवळ भीष्मच, दुमरी उपमाच नाही. परंतु सार्वजनिक चारित्र्य पाहिले म्हणजे त्याच्या बदु- रंगीपणाची तोड श्रीकृष्णाशिवाय कोणीच करूं शकत नाही. भीष्मांनी ज्या- प्रमाणें आमरण कौरवकुलाचा सेवक म्हणून आयुष्य घालविलें व तीन पिढ्या- पर्यंत वस्तुतः सर्व कौरवसाम्राज्य स्वतःच्या कर्तृत्वानें चालविलें, त्याप्रमाणेच आमरणांत आपणास श्रीनृसिंहसरस्वतीचे पदरज म्हणवून घेऊनच, काय, वाटेल तें झालें तरी ती पायरी न सोडतां त्यांनी सांप्रदायाचा योगक्षेम वाहिला. आंगीं एवढा अधिकार असतांही स्वतः त्यांनी कधीं वडील माणूस या नात्या- खेरीज इतर रीतीनें नुसतें कोणास पायांही पडूं दिले नाहीं; अथवा एक तुळ- सीचें पानही डोक्यावर ठेवूं दिलें नाहीं. मग, फुलाची माळ घालणे, वगैरे पूजेचा प्रकार तर दूरच राहिला. सभेचे अध्यक्ष किंवा असलेच कांहीं लौकिक प्रकार सोडले तर, त्यांना फुलाची माळ घालावयाची म्हणजे महाराजांच्या पूजेतील माळ देवाचा प्रसाद म्हणून घालावी लागे. त्यांच्या अलीकडील अव- ताराला फुलाची माळ फारच खुलून दिसत असे. जोडा ते फार क्वचित् प्रसंगी घालीत असत, परंतु तशा वेळीं पायांत जोडा, त्यावर नेसलेले रेशीमकाठी. फै. म. म. द. वा. पोतदार, ग्रंथ संग्रह