पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/२३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाऊसाहेबांची राहणी. तेजस्विता, स्वभावसिद्ध लोकनायकत्व, आणि इकडचा डोंगर तिकडे करून टाकणारा दीर्घोद्योग, या भाऊसाहेबांच्या ठिकाणी असलेल्या बीजभूत तत्त्वांनीच त्यांचा पिंड बनलेला होता. म्हणूनच पूर्णपणें विकास पावून, तीं अण्णासाहेब यांचे ठिकाणी पराकाष्ठेच्या उत्कटतेनें वास करीत. असो. ४ पेशवाईची अखेर झाल्यावर भाऊसाहेब सुरतेला गेले. तेथे त्यावेळची वकीलीची परीक्षा त्यांनी दिली. ते कांही दिवस मुंबईस वकीली करीत असत, . परंतु तेथील हवा त्यांच्या प्रकृतीस न मानल्यामुळे, ते पुन्हा पुण्यास परत आले, ते अखेरपर्यंत तेथेंच होते. पुण्यास आल्यावरही ते बहिणीकडे म्हणजे परांजपे यांचेकडेच राहात. पुण्यास पटवर्धनांचा छोटासा वाडा आहे, तो याच सुमारास अण्णासाहेबांच्या मातोश्रींनी बांधविला. त्याची रचना साधी परंतु मोठी सोईवार आहे. ती पाहिली की, या बाईच्या उद्योगप्रियतेची आणि धोरणीपणाची किंचित् साक्ष पटते. असे सांगतात की, वाडा बांधून तयार होईपर्यंत, भाऊसाहेब यांस त्याचा पत्ताच नव्हता; आणि तो आपलाच वाडा आहे असे कळल्यानंतर, बरेच दिवस त्या वाड्यांत जावयास ते तयार होई- नात. शेवटी एक दिवस जेव्हां त्यांना बळेच तेथे आणून बसविलें, तेव्हां कुठें ते तेथें राहूं लागले ! त्यांचा एकंदर परिवार फार मोठा होता. पांच भाऊ व त्यांचे परिवार, चार आश्रित मंडळी, स्नेही सोबती; नौकरचाकर आणि येणारे जाणारे, मेणागाडी, इत्यादिकांच्या योगानें शनवारवाड्याच्या अत्यंत लगत असणाऱ्या त्या जागेत, वैभवाची छोटीशी मूर्ती नांदतांना दिसत असे. एकादें अत्यंत सुंदर आणि मौल्यवान् वस्त्र प्रचंड वातानें कुठल्याकुठें उडून जावें, त्याप्रमाणे पाहतां पाहतां उडून गेलेल्या शनवारवाड्यांतील राजवैभ- वाची ही एक लहानशी दशीच शेजारच्या झुडुपावर अडकून डुलत होती की काय कोण जाणें ! चरित्रकारांच्या चालीप्रमाणे मी हें कांहीतरी खुलवून लिहितों आहे असें नाही; नायकाशी संबंध असलेल्या प्रत्येक गोष्टीचें कौतुकच कराव- याचें, म्हणूनही हे लिहीत नाहीं; यापेक्षां किती तरी पटीनें श्रीमान् असलेली घराणी त्या वेळीं पुण्यांत वागत होती, परंतु तीं बहुतेक अस्ताव्यस्त रीतीनें आणि कुठे कांहीं तर कुठें कांही अशा रीतीनें राजलक्ष्मीची अंगें पृथक्षणें कशीतरी सांभाळून होती. परंतु येथें तीच राजलक्ष्मी अत्यंत सूक्ष्म प्रमाणांत का होईना, परंतु आपल्या संपूर्ण अवयवांनी एकत्र नांदत होती. श्रीअण्णा-