पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/२३०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२०६ साक्षात्परिचय ' धोतर, पांढरा शुभ्र आंगरखा, व जरीचें उपरणे, आणि त्यावर लोळणारी पांढरी शुभ्र दाढी, कोमल हास्य, दयाई दृष्टि, विवेकपूर्ण भालपटल, आणि वृद्धापकाळामुळे उमगत दिसणारी गंडस्थळे, आणि सर्वांच्यावर आटोपसर असें लाल रंगी पागोटें, हातांत काठी, चेहऱ्यावरील तेजःपुंजता व सरलता, आणि त्यांनी 'नको' 'नको' म्हटले असतांही त्यांच्या शरीराच्या सर्व ऐटींत अट्टाहासानें प्रगट होणारें त्यांचें लोकेश्वरत्व, या सर्वांत महाराजांच्या पुष्प- हारांची भर पडली म्हणजे पहाणाऱ्याच्या नेत्रांस क्षणभर टक पडत असे. अलीकडे पांढरा क्षुभ्र आंगरखा रेशीमकाठी धोतर व जरीचे उपरणें हा त्यांचा बाहेर वागावयाचा पोशाख ठरून गेला होता. या त्यांच्या रेमीमकाठी धोतराचें आजपर्यंत त्यांच्याविषयी बोलणा-या बहुतेक सर्व वक्त्यांनी मोठे कौतुक केलेलें आढळतें; आणि अंतःस्थिति कांहीही असली तरी बाहेरच्या पोशाखांत ऐटदारपणा सांभाळला पाहिजे, म्हणून आम्ही 'वस्त्रांभूषणांचे' लोक त्यांचें उदाहरण देतो. परंतु वस्तुस्थिति अशी आहे कीं, वस्त्रांभूषणांत नीटनेटकेपणा ठेवला पाहिजे म्हणून तो त्यांनी कधीही ठेवला नाहीं. तो सहज ठेवला जात होता, हे त्यांचें विशिष्ट प्रारब्ध. आणि ज्या गर्भश्रीमंतींत ते वाढले तिच्या मानाने पाहिले असतां रेशीमकाठीं धोतर म्हणजे कांहीं त्यांच्या दृष्टांत मुद्दाम वापरावयाची विशेष वस्तु नव्हती. नेसावयाचें धोतर म्हणजे तें रेशीमकाठीच असले पाहिजे, इतकी ती अगदीं त्यांच्या ठिकाणी सरळ गोष्ट होती. घरीं नित्य वापरावयाचें साधेकाठी धोतर यास त्यांनी ' धोतर ' म्हटल्याचें कधीं कोणाच्या ऐकण्यांत नाहीं. 'अरे, पंचा कोठे आहे ? ' असें म्हणूनच ते त्याचा उल्लेख करीत. घरांत माणसाने पंचे वापरावयाचे, मग तो कितीही श्रीमंत असो, व बाहेर जातांना धोतर नेसावयाचें, हें जुनें वळण त्यांना लागलेले होतें, त्याला अनुसरूनच त्यांचे वागणें होतें. बाहेर जावयाचें, म्हणून मुद्दाम धोतर नेसावयाचें, एवढा • हव्यास तेथें उरलेला नव्हता. बाहेर जावयाची वेळ झाली म्हणजे, खुंटीवर पहावयाचें, व तेथें जो काय त्यांचा पंचा अगर धोतर असेल तें नेसून, आणि आंगरखा अथवा कोट घालून बाहेर पडावयाचे एवढेच त्यांना ठाऊक. एरवीं घरांतला सर्व वेळ त्यांचा उघड्यानेंच जात असे. फारच थंडी पडली असली तर उगीच थोडा वेळ सद्रा अंगास लागला तर लागला. त्यांचा विवाह झाला होता, व मनूच्या म्हणण्याप्रमाणे त्यांनी यथाशास्त्र पितृ ऋण फेडलें (