पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/२३९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

शुष्क वादविवाद. २१५ केलेल्या असाव्यात, म्हणजे त्या वादांतून कांहींतरी निष्पन्न होते. नाही तर फुकट ' लाथांचा सुकाळ' होतो. विषयाची मांडणी करतांना परिभाषेचा आणि प्रमाणांची निश्चितता करण्याची एक बाब अजीबाद गाळूनच टाकल्या- मुळे मोठमोठ्या लेखकांच्या लेखांतही विसंगतपणा उत्पन्न होतो. आपल्या मतलबास हवें तेवढे उचलून धरावें, बाकीचें खुशाल गाळून टाकावें, व मानेल त्या कल्पना सिद्धांतवाक्य म्हणून जोरानें मांडाव्यात, म्हणजे आपले लिहिणे अथवा बोलणें अपसिद्धांत म्हणून ठरण्याची भीतिच नाहीं, असल्या तऱ्हेच्या वादविवादांत ते कधीही शिरत नसत.

  • समजुतीकरितां म्हणून अगदी अलीकडील एक उदाहरण देतों. प्रसिद्ध

इतिहास संशोधक वि. का. राजवाडे यांनी 'राधामाधव चंपूच्या ' प्रस्ता- वनेंत भारतवर्षीय क्षत्राचा इतिहास लिहिण्याची प्रतिज्ञा करून त्यांच्या सामर्थ्याप्रमाणे ती पुरीही केली आहे. असें करितांना त्यांना मध्येच वेद व त्यांतील कांहीं सूक्ते यांचा समाचार घेणें भाग पडलें व मोठ्या युक्तीनें त्याप्रमाणे करून त्यांनी आपला कार्य भाग साधला आहे. व स्वतःच्या बेतास अर्थ जमेना तेव्हां वेदाचा स्वरच चुकला असला पाहिजे नव्हे आहेच असा यांनी निर्णय केला आहे. राजवाडे हे फार विशद लेखक म्हणून प्रसिद्ध आहेत परंतु जिज्ञासूंना हा भाग वाचितांना ज्या सामान्य गोष्टी अडतात त्याची ही त्यांनी फोड केलेली नाही. याचे कारण काय तर वर सांगितल्याप्रमाणे लेखन- पद्धति कसें तें पहाः - ( १ ) वास्तविक ब्रह्मणरस्पति हा देव आहे किंवा मनुष्य आहे हें जर ठरवावयाचे आहे तर जितकी सूक्त त्याची आढळतील अथवा जितके उल्लेख इतर सूक्तांत आढळतील ते सारे एकत्र करून त्यावरून काय बोध होतो, ती स्तुति माणसांना लागू पडते कां कोणा दिव्य शक्तीस लागू पडते हें ठरवा - वयास पाहिजे होतें व ( २ ) ' सोमानं स्वरणं कृणु " वगैरे ज्या त्याच्या प्रार्थना आहेत तशा तऱ्हेची ' सोम पिणाऱ्याला उत्तम कांति दे' वगैरे प्रार्थना देवतेस न करितां माणसास केल्याचें एकादें दुसरे उदाहरण ऋग्वेदांत आढळतें किंवा काय तें पहावयास पाहिजे होतें. पण तसे न करितां एकच ऋचा घेऊन व कांहीं शब्द घेऊन त्यांनी