पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/२४२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२१८ साक्षात्परिचय अशा तऱ्हेचे शुष्क वाद सोडले तर सर्व तऱ्हेच्या भाषणांत ते मनापासून भाग घेत, व पुष्कळ बोलत. अमुक एका तऱ्हेची माहिती ऐकणारास नसावी, असे कधी त्यांना वाटलेच नाही, त्यामुळे पर- मार्थाच्या गोष्टींपासून तों बारीकसारीक सांसारिक गोष्टींपर्यंत, इतकेंच काय, तर पूर्वकालीन पुण्यांतील नायकिणींच्या अनेक प्रकारच्या तहांपर्यंत सर्व गोष्टी प्रसंगोपात्त ते बोलत. असे करण्यांत, भोवतालच्या लोकांस बहुश्रुतपणा उत्पन्न होऊन सदभिरुचि उत्पन्न व्हावी, असाच त्यांचा हेतु असे. चांगले आणि वाईट हे दोन्ही पुढे मांडून त्यांचें अंतरंग उघडें केले म्हणजेच माणसांत खरी व जिवंत सदभिरुचि उत्पन्न होते. एरवीं संवयीमुळे जरी , आहेत व ' आहं अजानि वगैरे प्रार्थना अश्वसंगत झालेल्या राजमहिषीनें म्हणावयाची आहे. गणांतल्या स्त्रियांनी नव्हे. असे असतां ह्रीं दोन एकत्र कां केली ? का गणपती व वसू एकच. ? [ पण तसे मागील अध्यायावरून दिसत नाही. वसू व गणपती असे स्पष्ट वेगळे उल्लेख असून गणपति शिवाय एका वेगळ्या अधिपतीचा उल्लेख आहे. ] अशा अनेक भानगडी दडपून टाकून राजवाडे सिद्धांत मांडणार व त्यांचें वाक्य गृहीत धरून त्यावर वादविवाद होणार इतक्या सर्व घोटाळ्याचें कारण काय तर प्रमा- णांची प्रमाणताच मूळ लक्ष्यांत घेतली नाही. शिवाय मोठा प्रश्न तर उरतोच. सर्व देवांच्या मागें मूळ कोणी माणूस होता असे जरी धरिलें तरी सूक्तकारानें तें देवतावुद्धीनें केलें नसून माणुसवुद्धीनेंच केले आहे असे तेवढ्यावरून कसें ठरतें १ पंढरीचा पांडुरंग हा मूळ कोणी तरी एकादा विशेष माणूस असेल कदाचित्. पण तेवढ्यावरून श्रीतुकोबांचे 'विराण्या' चे अभंग म्हणजे त्याच्यावर आषक झालेल्या एकाद्या बेफाम छवेलीची जवानी आहे असे म्हणतां येईल काय ? जर तसे नसेल तर सूक्तकाराची खरोखरच देवता- बुद्धी असल्याकारणानें त्याच्या अभिप्रायास धरून असलेला स्वर चुकीचा कसा म्हणतां येईल ? याप्रमाणेच 'पुरुषसूक्त गणपत्यथर्वशीर्ष इत्यादीं- वरील त्यांच्या विवेचनाची गति आहे. पण त्याच्याशीं आपणांस कांहीं कर्तव्य नाहीं. तो स्वतंत्र लेखाचाच विषय आहे व तें काम राजवाड्यांसारख्या पंडितांचेंच आहे. 76 ,