पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/२४४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२२० 'साक्षात्परिचय ' होता. तेव्हां ते म्हणाले, 'अरे, तें बरें आहे. त्यानें त्या शब्दांचा मनावरील एक प्रकारचा फाजील ताण निघून जातो, व मन साफ होतें. मानसशास्त्रदृष्ट्या यांत तथ्य नाही, असे कोण म्हणेल ? परंतु कांहीं झालें तरी, ही विषारी औषधी आहे, व तिचा एकादा टक द्यावासा जरी वाटला, तरी तो मोठ्या युक्तीनें व बेतानेंच द्यावयास पाहिजे, हें हि पूर्वशिष्टांनी लक्षांत ठेवले होते, हे विसरतां कामा नये. सारांश काय, की सर्व तऱ्हेचा निर्भय पणा ऐकणाऱ्याच्या अंगीं उत्पन्न व्हावा, हे त्यांच्या शिकवणीचे मुख्य सार होतें. गोष्ट चाईट कां असेना, तिच्यापासून भित्रेपणानें परावृत्त होणें, त्यांना कधीं आवडले नाही निर्भयपणानें तिच्यासमोर राहणें, अथवा मनाच्या ऐटीनें तिला तुच्छ करून टाकर्णे त्यांना आवडे. आणि सर्व प्रकारच्या मानवी प्रवृ- त्तींचा योग्य तऱ्हेनें निर्वाह करूनच पुढे न्यावयाच्या त्यांच्या पद्धतीला तें अनुसरूनच होतें. आणि म्हणूनच त्यांनी आपल्या स्वभावांत. एका बाजूने पराकाष्ठेची निरहंकारता, तर दुसरीकडून उत्कट साभिमानता ठेवून, तशा तऱ्हेच्या स्वभावतः विरोधी गोष्टीही, त्यांच्यातील विरोधाचा कशा रीतीनें परिहार करून वाढवाव्या तें शिकविले. आणि त्यामुळे हल्लीच्या विरोधी परि- स्थितीची दोन्ही अंगें सांभाळून कसे व्हावें तें दाखविलें. त्यांच्या राह- ण्याची मुख्य खुची अशी होती कीं, जेथें केवळ त्यांच्या व्यक्तीचा संबंध येई, तेथे अगदी कमालीची निरभिमानता असावयाची. अगदी ह्या गालांत मारली, तर तो गाल पुढे करावयाची तयारी, परंतु जेथें सामाजिक प्रश्न आला तेथें मात्र त्या सामाजिक जीवनास अवश्य असे सर्व त-हेच अभि- मान उत्कटतेनें असावयाचे. आणि ही गोष्ट फक्त एका निर्भयतेनेंच शक्य आहे. कारण, एका गालांत मारली असतां सारी क्षिति गिळून टाकून दुसरा पुढें करण्यास जें धैर्य लागतें, तेंच धैर्य आवेशानें तरवारीवर तुटून पडण्या-

  • ज्या गोष्टी वाईट अथवा अयोग्य असतील त्या एवढ्या करितां मुद्दाम

करावयाच्या व महाश्वेतेसमोरून एकदम निघून न जातां मुद्दाम ठाण मारून बसावयाचे असा याचा अर्थ खास नाहीं ! कोणत्याही गोष्टीचा फार बाऊ करणेंही मानसशास्त्रदृष्टया अपायकारक असतें येवढाच भावार्थ आहे.