पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/२४७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

साधनकालाचे दोन भाग. २२३ केले पाहिजेत, कसे हाल सोसले पाहिजेत, मनाचा ताप किती होतो, व विवेकानें, निग्रहानें, युक्तीनें आणि प्रार्थनेनें हळू हळू त्याची वाट कशी लावतां येते, याविषयींची साधकांच्या ठिकाणी वीर्यात्साह वाढता रहावा म्हणून सर्वजण सारखी माहिती देतात. क्वचित् थोडेसे देवाचा साक्षात्कार कसा झाला, केव्हां एकादेवेळी कशी कृपा कोणी केली, अथवा साधन क्रमानें इंद्रियातीत स्थलीं प्रवेश केल्यावर तेथे काय काय दिसलें, वगैरे माहिती देतात. त्यांच्या साधनांचा साधारण वर्गही कळतो; परंतु तपप्रत्याहार जर वाजूला टाकले तर, बाकाची माहिती अशी असते की उत्साहवर्धनापलीकडे साधकास प्रत्यक्ष तिचा उपयोग कांहीही होत नाहीं म्हणजे तपप्रत्याहारांनी दावांत धरलेल्या व मलविक्षेपरहित मनाचा अतींद्रियतेंत प्रवेश होण्याला अथवा जास्त शुद्ध भाषेत बोलावयाचें म्हणजे, अशा मनाला हळू हळू सोडून अतींद्रियतेचा अनुभव येण्याला त्यांनी निरनिराळे जे अभ्यास केले, अथवा तप आणि भगवत्कृपा यांच्या योगानें हळू हळू अतींद्रियता त्यांना कशी प्राप्त झाली, त्या मुद्याच्या गोष्टी माल कोणाच्याही बाहेर आलेल्या सांपंडत नाहींत. आणि साधकाची धांव तर प्रथमतः याच गोष्टी समजण्यावर जाते, व अगदीं मोकळ्यांत मोकळे बोलणारे रामकृष्ण परमहंस घेतले, तरी त्यांच्यापाशीही जिज्ञासेला हिरमुसली होऊन परतावें लागतें. जी गोष्ट केवळ मनुष्य यत्नानेंच सद्यःप्राप्त नाहीं, व भगवत्-कृपेनेंच मिळणारी आहे, अशी प्रचंड तळमळ जर सोडली तर या भागांतून प्रत्यक्ष आचरणाकरितां साधकास काय उचलण्या- जोगतें आहे ? तेव्हां असे दिसतें कीं, रामकृष्ण असोत की कोर्णाही असोत आपले अनुभव लोकांस देण्याची त्यांची कांहीं ठराविक तन्हा दिसते. पूर्वोक्त साधनमार्गाच्या तीन भागांवरून साधनकालाचे मुख्य दोन भाग पडतात. एक, तप, प्रत्याहार, अभ्यास, संवेग आणि कृपा या पांचांच्या योगानें कांहीं काल तप वाढल्यावर, पुष्कळ दिवसांच्या रखरखलेल्या उन्हावर पावसाची सर यावी, त्याप्रमाणे मनुष्येभाव लपून दिव्यत्व प्रकट होण्यास प्रारंभ होऊं लागतो. हा जो पुष्कळ दिवसांच्या उन्हाळ्यावर पावसाळ्याचा एक दिवस येतो तेथपर्यंतचा एक भाग, आणि त्यानंतर सारी गानें शीतल होऊन पुढें केशरहित, उल्हासानें पूर्णता संपादीपर्यंत गेलेला एक भाग. यांतील पहिल्या कालासंबंधानें आपले अनुभव आपण होऊन शिष्यास द्याव-