पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/२४९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

योगपूर्वीगांचे महत्व. २२५ शिष्याच्या मनाची, तो कितीही समर्थ असला तरी, 'चाउटी ' होऊन जाते, व त्यामुळे तो अगदी मार्गगलितच झाला नाहीं, तरी त्याचे काम फार कठीण होऊन, फार श्रम व काल लागतो. पतंजलींनी योगाचे पूर्वांग आणि उत्तरांग असे दोन भाग केलेले आहेत. यांतील उत्तरांगाच्या चटकदारपणाची माहिती ऐकून मनास जो चटका लागतो त्यामुळे, उतावळीनें अथवा कर्तृत्वाच्या अभिमानानें पूर्वांग घट- विणें जिवावर येतें, किंवा अनवश्यक वाटतें. आणि पूर्वंग अति उत्तम घटल्या- खेरीज काय वाटेल तें केलें तरी उत्तरांग केव्हांही जमणे शक्य नाहीं. कचित् कोठें निर्धारानें थोड़ें जमलें, तरी अखेरीस पाण्यांत वुडविलेल्या भोपळ्याप्रमाणें मन पुन्हां वेगानें बाहेर पडतें, व सर्व अभिमान सोडून जेव्हां पुन्हां खडे मांडावे, तेव्हांच हिशोब जमतो. तसेच मनाचा हा धर्म तर प्रसिद्धच आहे, कीं त्याला जी नको ती सूचना जास्त पटते. द्रव्याकरितां अनुष्ठान करणाऱ्या गृहस्थास जप करतांना 'वानराची कल्पना डोक्यांत आणूं नको' म्हणून सांगितलें असतां अखेरीस त्यानें लासून गुरूला ' एवढी सूचना तुम्ही मला न देतां, तर बरें झालें असतें; कारण त्यापूर्वी वानराची कल्पना माझ्या डोक्यांत केव्हांही आली नाहीं, परंतु आतां मात्र तें माझा पिच्छा सोडीत नाही,' असें सांगितल्याची गोष्ट प्रसिद्धच आहे. हल्ली योगाची खटपट करणारे कित्येक लोक आढळतात, परंतु उत्तरांगांत प्रवेश न झाल्यामुळे हताश झालेले, दांभिकपणानें कांहीं तरी स्तोम माजवून बसलेले, अथवा निरर्गलतेनें सर्व गोष्टींस सरसहा शिव्या देणारेच बहुतेक सांपडतात. व शेवटी योगशास्त्र अथवा निदान त्यांतील अनुभवी म्हणविणारे पूर्व प्रचलित सर्व लोक मूर्ख, अथवा ढोंगी ठरण्याची वेळ येते, याचें तरी कारण हेंच आहे. कांही काल नियमित आचरण व अभ्यास, आणि साधारण नीतिशास्त्रास धरून दोषरहित वर्तन, असे असले कीं यमनियमादि सारी पूर्वाग साधलीं असे वाटतें, व एकदम उत्तरांगास मनुष्य हात घालतो. परंतु, नीति फक्त माणसास दोषापासून परावृत्त करते, आणि यम, नियम, आसन, प्राणा- याम प्रत्याहार, ही माणसाच्या ठिकाणी विशेष गुण व सामर्थ्य रूढ करतात हें लक्षांत येत नाहीं. त्यामुळे या सर्वांनंतर धारणासु योग्यता मनसः , १५