पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/२५२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२२८ ' साक्षात्परिचय सांगितलेंच आहे कीं वेदानें तर उलटें मागावयास शिकविलें आहे, व आज्ञा केली आहे. परंतु या दोन गोष्टी एक करणें हें ठीक नाहीं. या दोन्ही स्वतंत्र आहेत. म्हणून, आपले काम म्हणून देवाची सेवा केली पाहिजे, व देवाजवळ मागण्याचा आपला हक्क आहे, म्हणून मागितलें पाहिजे. मात्र, मागणे पुरेल म्हणून सेवा, अथवा पुरेल तोपर्यंत सेवा, ही विचारसरणी ते खोडून काढीत. आणि अशा धोरणानेंच त्यांनी पूर्वी दिल्याप्रमाणे एका ठिकाणी ' वासनेचा उत्पादक श्री आहे, आपण श्रीची सेवा करावी. अर्थात् निरिच्छपणें तो धनी, स्वामी, गुरु, पिता, आणि देव आहे. आपल्या वासना सुवासना करून सिद्धीस नेणें त्याकडेच आहे.' असे लिहून ठेवले आहे. व हें प्रत्यक्ष लोकांच्या मनावर बिंबावें, म्हणून स्वतः त्यांनी पूर्णाभिषिक्त असतांही केवळ सामान्य मुमुक्षूचा बाणा आपल्याकडे घेऊन आपले बिगार इयत्तेतील श्रीगणेशा गिरविणे अखेरपर्यंत सोडले नाहीं. , आम्हास खात्रीलायक माहीत आहे की धुळ्याच्या श्रीनारायणबोबांइतकाच महाराजांचा सांप्रदाय चालविण्याचा त्यांनाही अधिकार होता, व तशाच कांही प्रसंगानी कोणास लिहून अगर तोंडाने त्यांनी कांहीं सांगितले नाही, असेही नाही. परंतु आपल्याकडे आचार्यत्व न घेतां, साहजिक रीतीनें त्यांनी तें केले. एरवी कोणीही त्यांना विचारले असतां, त्यास ते 'हा अधिकार आळंदी व धुळे येथील संस्थानांचाच आहे' असे सांगून तेथील सांप्रदायिक दीक्षा घ्यावयास सांगत. वेगळे वेगळे सांप्रदाय यांच्यांत कांही शास्त्रीय रहस्य आहे, की ही केवळ लौकिक सृष्टि आहे, त्याचप्रमाणे सांप्रदायिक मंत्र आणि तंत्र यांत काहीं स्वतंत्र सामर्थ्य आहे, किंवा तो एक केवळ भाविक भजनाचा प्रकार आहे, आजकालच्या पतित स्थितीत सर्व गोष्टीप्रमाणे याही परमार्थ पद्धतींत जिकडे तिकडे महारवाडा होऊन गेला आहे, ही गोष्ट खरी, तरी अण्णासाहेब सार- ख्यांनीं तिचा जो पुरस्कार केला तो काय केवळ महाराजांची दुकानदारी चालविण्याकरितां, किंवा तिच्यांत तसेंच कांहीं तरी तत्व आहे म्हणून, या साऱ्या प्रश्नांचा खल करण्याचें स्थळ नव्हे. तरी, एवढे सांगितलेच पाहिजे कीं, कोणाला सांप्रदायिक दीक्षा घ्यावयास सांगत असतां 'अरे, आम्ही त्या मार्गानें गेलो आहोत, म्हणून तुला सांगतों, उगीच तुला कांहीतरी सांगून