पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/२५५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

लोकमान्यांकरितां प्रार्थना. २३१ अगदी प्रारंभी सांगितलेंच आहे की, यांना शौचास फार वेळ लागत असे. म्हणजे पुरा एक तास लागत असे. शौचाहून आल्यावर त्यांच्या सर्व आह्नि- कास सुरुवात होत असे. तें सर्व काय काय होतें, हे कळण्यास साधनच नव्हतं. आणि त्याची आवश्यकताही पण नाही. तरी पण जें कांही थोडेंबहुत काना- वर पडे, त्यावरून असे दिसतें कीं, त्यांतील पुष्कळसा भाग सामान्यत्वेकरून “ भारतवर्षीयाणां भरतखंडस्थितानां वैदिकधर्मीयाणाम् ' आणि विशेषेकरून ८ ' मम तथा च मामकानां इत्यादि अस्माकं सर्वेषाम् अर्थेच' असे, व त्यांतील कांहीं कांही गोष्टी तर मुद्दाम 'अमक्याकरितां, ' व अमुक कारणाकरितां 6 अशा असत. १ लखनौ कांग्रेसच्या वेळेला लोकमान्यांचा जो अपूर्व सत्कार झाला, आणि राष्ट्रानें वाहिन्याचेही कान फोडून त्याच्या डोक्यांत भरेल अशा रीतीनें त्यांच्या- विषयींची ' मान्यता व्यक्त केली, त्यावेळी अण्णासाहेब आळंदीस होते. अलीकडे कधीं कोणची वर्तमानपत्रे ऐकण्याची व वाचण्याची त्यांना इच्छाच होत नसें व कारणही पडत नसे. कारण सर्व प्रकारची लोकवार्ता कानावर आपोआपच येत असे. या सत्काराची ही हकीकत त्यांचे कानावर आली. परंतु तेवढ्य़ानें संतुष्ट न होतां आवडीचा पदार्थ पुन्हा पुन्हा जसा मागून घ्यावा, तसें वर्तमानपले मुद्दाम आणवून त्यांतील हकीकत ते वाचवीत, व त्यांना मोठा आनंद झाला असे दिसे. याविषयीं बोलणें निघालें असतां, सहज ते बोलून गेले, 'अरे, कां आनंद होणार नाहीं ? रोज महाराजांची प्रार्थना करतों ना, 'त्याची अशी कीर्ति होऊं द्या, ' म्हणून ? ' महाराजांचा प्रसाद घेणें, आरती घेणें, इतकेंच तर काय, पण नुसते दर्शन घेणें, अशा गोष्टींपासूनही, स्वतःमिळतीं दुस-याकरतां ते प्रत्यक्ष कर्म करीत; म्हणजे ' हो अमक्याकरतां नमस्कार,' अथवा 'सर्वत्रांकरतां,' असे म्हणून प्रत्यक्ष ते कर्म करीत. पानावर बसून नुसते नैवेद्य दाखवावयाला लागले, तरी, अथवा, महाराजांची आरती घ्यावयास लागले तरी, अर्धा पाऊण तास सहज निघून जात असे ह्याचें कारण हेंच. सर्व विश्व हें युतायवघटित एक वस्तु आहे, हा महासिद्धांत घेतला कीं, ला दुसऱ्याकरतां कर्म करतां येतें, हा प्रतिसिद्धांत सहजच सिद्ध होतो. त्यांचे सारे व्यवहार या तत्त्वाला धरून असत.