पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/२५७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

वालोन्मत्तजस्ता. २३३ त्यांना फार क्वचित् मिळत असल्या कारणानें व मध्यंतरी एका मागून एक अशा अनेक भानगडी उपस्थित होत असल्याकारणानें, एवढेसें आह्निक आटो- पावयास वेळेस त्यांना २१२ दिवस लागत ! हे सर्व आह्निक आटोपलें म्हणजे स्नान करीत, व तसेच ओलेत्याने तुळसीवृंदावनांतील गणपतीपार्शी पुन्हा दीड दोन तास वसत. नंतर देवास बेल व भस्म वाहून श्रीगुरूचरित्राच्या कांही ओव्या वाचीत, व मग दुसरें वस्त्र परिधान करीत. एवढे कडकडीत सोंवळ्याचें काम केल्यावर बाकी सर्व व्यवहार ते : कार्पासं कटिनिर्मुक्त' या शास्त्रास धरून धूतवस्त्रावरच उरकीत. आंघोळीस बसले म्हणजे अतिशय कडकडीत पाणी लागत असे, व अशा विपुल पाण्यानें स्नान करण्याची मनापासून आवडी असल्यामुळे भले मोठे दोन हंडे जरी तापविले, तरी त्यांनी कधीं 'नाहीं' म्हटलें नाहीं परंतु त्यांतली मौज अशी होती की अंघोळ करतां करतां मध्येच ते म्हणावयास लागत. व तसें म्हणतांना शेवटी आंग पुन्हां थंड होऊन पुन्हां कुडकुडत बाहेर येण्याची पाळी येई ! असे होऊं नये म्हणून त्यांचे म्हणणे झाल्यावर मुद्दाम त्यांना घालण्याकरतां ऊन पाणी राखून ठेवावें, तरी पण शेवटीं असे व्हावें की काय वाटेल झाले तरी तें कांहीं साधूं नये. सारे पाणी संपून अखेरचा तांब्या हातांत घेतला, कॉ त्यांनी आपली सुरूवात करावी. यामुळे अखेरीस स्नान घालणाऱ्या श्रीभक्त सीतारामपंत दांडेकर यांच्यासारख्या एकनिष्ठ भक्तांची नुसती चरफड उडून जाई. परंतु त्याला काही उपाय नव्हता. । अशा कित्येक प्रसंगी त्यांचे वर्तन एकाद्या भानावर नसलेल्या माणसासारखें होत असे. ' दोन प्रहर ओले राहती। ऊष्णोदकें स्नान करिती । ' असे सौ ० भागीरथीबाईंनी कौतुकपूर्ण वर्णन केले आहे. निव्वळ डोक्यांत राख घालून नागवें उघडें हिंडणें असाच पिशाच शब्दाचा अर्थ केला तर गोष्ट वेगळी. एरवों पूर्ण साम्यावस्थस गेलेले एकच मन निरनिराळ्या वेळी वालोन्मत्त जड कसें राहतें याचें तें उदाहरण होते. मात्र पाहणाऱ्याची दृष्टी सूक्ष्म पाहिजे होती. संडळींत बसून बोलत असतांही त्यांचे धोतर अस्ताव्यस्त होऊन जाई, परंतु त्याची त्यांना शुद्ध नसे. इतकेंच तर काय पण अशा वेळीं जवळ कोणी नवखा असल्यास त्याला अनभ्यस्ततेमुळे थोडेसें जें चमत्कारिक होऊन जाई, तेंही त्यांच्या लक्षांत येत नसे. पोटदुखीच्या आजारांत त्रास होई म्हणून . ते नुसती लंगोटीच नेसत. कित्येक वेळां असें होई की गच्चीवर उभे राहून