पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/२६८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२४४ साक्षात्परिचय ' ठरावयाचे आहे.' त्यावर ' आमच्यावर अवलंवून आहे, हें तर खरेंच,' असें म्हणून ते एकदम झटक्याने म्हणाले कीं 'मूर्ख आहे तो; काय व्हावयाचें आहे तें ठरलेले आहे. असो. 6 & सर्वांच्या खन्या कल्याणाकरितां एकट्याच्या वैभवाचा केलेला हा प्रचंड त्याग पाहिला म्हणजे, त्यांच्या एकंदर राहणीचें नवल वाटेनासें होतें. आणि त्यांच्या सबंध चरित्रांतून जर कांहीं एक शिकवण घ्यावयाची असली तर, व्यक्ति- कल्पनेचा परोपरीनें नाश, आणि राष्ट्रीयत्वानें जगण्याचा अट्टाहास, ही निर्धास्त पणानें घ्यावी. म्हणजे त्यांच्या इतर सर्व शिक्षणाचें रहस्य आपोआप लावेल असे वाटतें. ' ब्राह्मणाचें सर्वस्व काय तें गायत्री; तीच तर मुळीं 'सर्वां- मिळतीं आपण ' असे सांगते, ' असे ते पुन्हा पुन्हा सांगत. आणि तेवढ्याच करितां गायत्रींत 'नः ' हें अनेकवचनी सर्वनाम योजलेलें आहे, आणि त्यांतही पुन्हा, 'अस्माकम् ' वनैरे प्रयोग न योजतां ' नः ' च शब्द योजं- लेला आहे. या शब्दाचें रहस्य ते असे सांगत कीं, 'गायत्री ही देवाची प्रार्थना आहे, मंत्र तर आहेच, परंतु प्रार्थनाही आहे. हिच्यांतील पहिला 'त' ब्रह्मपर, व अंतीचा अर्धा 'तू' ब्रह्मपर, 'त्स' पासून 'यो पर्यंत. निरनिराळ्या नाना पापांच्या क्षालनार्थ दोन ते अठरा आहेत. येणेकरून 'नः ' म्हणजे ' आम्हां सर्व प्रकारच्या मनुष्यांची बुद्धि शुद्ध होऊन 'प्रचोदयात् ' पर्यंत सर्व देवपदवी, व तिन्ही लोक प्राप्त होऊन ब्रह्मप्राप्तीस योग्य होतो. परंतु इतकेंही जरी झाले तरी या सर्वासही ईश्वरी कृपा पाहिजेच. इतकें होऊनही अखेरी साधणें, हें अखेरीस त्याच्या कृपेवरच अवलंबून असल्यामुळे, अंतःकरणांत त्याच्या कृपेनें हें चालले आहे असा विनीतभाव, आणि त्याच्या कृपेनेंच त्याने अखेरी साधून द्यावी, अशी शरणागति ही पाहिजेतच. अशीच शरणागति असणे, अथवा अशा रीतीनें देवापाशी 'तुझ्या कृपेचें दान दे' असें म्हणणे, म्हणजेच प्रार्थना. म्हणून गायत्री हा मंत्र आणि प्रार्थना दोनही आहे. आणि ही प्रार्थना ‘ सर्वांकरितां सर्व, ' आणि 'सर्वांमिळती आपण, ' हें मनांत बाळगून सर्वां- करितां एकट्यानें, एका ठिकाणी वसून, मुकाट्याने करावयाची आहे. आणि म्हणून त्यांत अनेकवचनी सर्वनाम घातलें एवंगुणविशिष्ट परमात्म्याचें ध्यान आम्हीं जीवांनी करावें, आणि ध्यान हे अर्थातच ध्येयाशीं एकरूप होऊन, व एक- प्रत्यय होऊन करावयाचें असतें- हे आमचें कर्तव्य आहे, त्या परमात्म्यानें /