पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/२७१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भिकाऱ्यांचे वेड. २४७ प्रसाद अशा आदरानें त्यांनी स्वतः घेऊन इतरांसही दिले, ते ज्यांनी पाहिलें असेल त्यांच्या स्मरणांतून केव्हांहि जाणार नाहीं. त्यांना दान करण्याचें जणूं कांहीं वेडच होतें, असें नेहमी म्हटलेले ऐकूं येतें, आणि तें यथार्थही आहे. मात्र इतकेंच कीं पूर्वी सांगितल्याप्रमाणे आप- ल्या इतर सर्व व्यसनांप्रमाणें हें वेड अथवा व्यसन देखील स्वाधीनतेचेंच त्यांनीं सांभाळळें होतें, पै, पैसा अथवा मूठभर धान्य मागणारे भिकारी तर घरोघरी येतात, व पुष्कळ ठिकाणी त्यांना मिळतेंही. परंतु यांच्याभोवती असलेल्या याचकांची तहाच निराळी. सामान्य भिक्षेकरी आला असतां यांनी त्याला नुसती मूठ अशी कधीं घातलीच नाहीं, अच्छेर, शेर, जें काय माप हाती लागेल, तें पदरांत पडून, तो जर तेवढ्यावरच गेला, तर त्याच्यासारखा दुर्दैवी कोणीच नाहीं ! त्याचप्रमाणे पैसा दोन पैसे देणे यांतही कांहीं विशेष नाहीं; परंतु कित्येक लोकांचे प्रपंचच यांच्यावर चालत होते, आणि कित्येक भिक्षकऱ्यांना ती एक वतनाची बाब होऊन बसली होती ! अमुक भिकाऱ्याला अमुक वारी एक पैसा द्यावयाचा, अमक्याला इतकें धान्य द्यावयाचें, अम- क्याला आला असतांना अमुक तऱ्हेचें भोजन घालून इतकी दक्षणा द्यावयाची येथपासून तो ५०/५० रुपयांपर्यंत असे धारे सहज ठरून जात. याशिवाय • कोणी धोतर मागतो, तर कोणी जोडा, छत्री, असें कांहीं उपयोगाचें मागतो, कोणी लघुरुद्र करावयाचा म्हणतो, कोणी देऊळ बांधतो, कोणी तिकीट काढून मागतो, असे त्यांच्या दानाचे अनेक पर्याय होते. त्यांना अनुकूल असलेली कोणचाही गोष्ट कोणी मागितली असतां, त्यांच्या तोंडून 'नाही' असे कधींच आलें नाहीं; इतकेंच नाहीं, तर अनुकूल नसलेलीही जर कांहीं प्रयत्नानें देतां येण्याजोगती असली, तरी ते तसें करून द्यावयास कमी करीत नसत. ही गोष्ट अर्थातच कुटुंबांतील इतर मंडळींना आणि त्यांच्याभोवती अस- लेल्या इतर गणांना पसंत पडत नसे, व त्यामुळे त्या भिकाऱ्यांना पुष्कळ वेळां या लोकांपासून त्रास होई. म्हणून या गोष्टींत ते कुणावरही विसंबत नसत. कसल्याही कामांत असले, इतकेंच नाही, तर त्यांच्या मंत्रपठणादि आह्निकांत असले, किंवा शौचासही गेलेले असले, तरी भिक्षेकऱ्याची हांक ऐकूं आली कीं तांतडीनें धांवतच खाली यावयाचे; आणि कसल्याही गडबडींत ते असले, तरी त्यांना भिक्षकऱ्याची हांकही पण नेमानें ऐकूं येई ! परंतु इतकें