पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/२७७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अलिप्तत्व. २५३ संधान जुळले तर अण्णासाहेब यांचाही फायदा करून द्यावा, असे होते त्या- प्रमाणें हो ना करितां करितां अण्णासाहेब यांनी जावयाचें कबूल केलें. औषधाचे निमित्तानें तेथे गेल्यावर काही तरी करून जम्नाबाईसाहेब यांचेकडून त्यांना गळ घालवावी, असा वेत होता. अण्णासाहेव यांनी जावयाचें कबूल केलें, व त्या.. प्रमाणें पोषाखही केला. परंतु तितक्यांतच काय वास आला कोण जाणे, त्यांनी संतापाने बाळासाहेबांस “ मला वाटवूं पाहतां काय ? ' असे म्हणून आंगरखा काढून ठेविला, व त्यानंतर इतर लोकांनी वाटेल तेवढा आग्रह केला, आणि वाशले लावले तरीही जम्नाबाईसाहेब यांचेकडे कधीं ते गेले. नाहींत. परिग्रह तर असोच, पण उलट पदरचें खर्चूनच औषध देण्याची पाळी येत असे. जी गोष्ट पैशासंबंधी, तीच गोष्ट मान स्तुति, वगैरे संबंधाची होती. कोणी एकादा उगीच स्तुति करूं लागला, अथवा आपला गौरव करूं लागला, तर त्याला अशाच कांहीं रीतीनें तटकन् तोडून टाकण्याची त्यांची संवय होती. एकदां एक डॉक्टर हे कुरुंदवाडकर की जमखिंडीकर कोणातरी संस्थानिकाला घेऊन यांचेकडे आले होते. त्यांच्या वडिलांचा आणि यांचा चांगलाच परिचय होता. ती मंडळी आल्यावरोवर संस्थानी थाटाचा नमस्कार चमत्कार करून त्यांनी अण्णासाहेब यांची थोरवी गाण्यास प्रारंभ केला. त्या- वेळचें यांचें वर्तन लक्षांत घेण्याजोगतें आहे. अगदीच तिन्हाईतपणानें नमस्कार घेऊन अण्णासाहेब यांनी तक्रार समजून घेतली, व डॉ. साहेबांच्या गळ्यांतच ते घोंगडें घालून दिलें. मंडळी उठून गेल्यावर त्यांनी सांगितले - " कोणच्याही गोष्टीत तटका तोडण्याची ताकद पाहिजे. जर मी या वेळेला उगीच थोडें जास्त बोलतों, तर हे अधिकच माझ्यामागे लागले असते. " परंतु याच्या उलट एकादा अत्यंत गरीब इसम औषधाकरितां आला, तर त्याच्याशीं मात्र तीन तीन तास बोलत बसत. 'आपण अण्णासाहेबांकडे गेलो व त्यांनी आपल्याकडे नीट लक्ष दिलें नाहीं, ' अशी पुष्कळांची तक्रार ऐकूं येते. त्याचें कारणही हेंच आहे. प्रख्यात शूद्र साधु गुलाबराव माधानकर यांचीही अशीच गोष्ट आहे. गुलाब- राव यांची विद्वत्ता प्रसिद्धच आहे. शूद्र जाति, जवळजवळ जन्मांधत्व, स्वधर्माचा व संस्कृतीचा कट्टा अभिमान इत्यादि गोष्टींमुळे त्यांच्या ठिकाणी वादविवादाची