पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/२८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

वाल्य. ध्यानाचा अभ्यास चांगला होता. जानकीचाईना ध्यानयोग नानांनी शिकविला. बहुतकरून ध्यानाभ्यासी डोळे मिटून ध्यान करतात. परंतु जानकीबाई आसन घालून डोळे उघडे ठेवून ध्यान करीत. त्या अवस्थेत कित्येक प्रसंगी त्यांच्या डोळ्यांतून अश्रुधारा वाहत असलेल्या पाहिल्याचें अण्णासाहेब सांगत. ध्यान- योगांत त्यांची गति किती झाली होती, हें पुढें एकदोन आख्यायिका सांगा- वयाच्या आहेत, त्यांवरून लक्षांत येईल. असो. मेण्याशिवाय घराबाहेर पाऊलही पडावयाचें नाहीं अशी जिची स्थिति, तीच जानकीबाई रोज पायीं देवाला जाऊन गुंडाच्या श्रीगणेशास प्रदक्षिणा घालू लागली, तेव्हां अर्थातच तो एक टांकेचा विषय झाला. घरांतील वडील माणसें व खुद्द भाऊसाहेब यांची बोलणी त्यांना निमूटपणें सोसावीं लागत. भाऊसाहेबासारख्या विलासप्रिय माणसाला बायकोचे असले तपस्वी वर्तन कसें खपणार ? परंतु तिच्या तेजस्वितेमुळे त्यांनासुद्धां ' अशा गोष्टी करूं नको' असें जोरानें सांगण्याचा धीर होत नसे. तरी पण पहिल्या पहिल्यांदा जानकीबाईंना बराच त्रास सोसावा लागला, अर्से श्रीअण्णासाहेब सांगत. पुढे एक लहानसा चमत्कार घडून आल्यामुळे भाऊ- साहेब यांची समजूत पटली. मग त्यांनी कधीं जानकीबाईंना अटक केली नाहीं. तो प्रकार असाः - प्रदक्षिणा घालतां घालतां जानकीबाईचे पाय सुजून गेले. परंतु त्या तशाच उठत बसत देवाला जात व फरपटत प्रदक्षिणा घालीत. तेव्हां एक दिवस मंगलमूर्तीला दया येऊन त्यांनी नानांना सांगितलें कीं, 'जानकीबाईची सेवा मला पावली. आतां पुरे कर म्हणून तिला सांगावें. ' त्याप्रमाणे त्यांनी जानकीबाईस सांगितलें, परंतु असली सांगोवांगीची उडवाउडवी कोठून खपणार ? त्यांनी उलट उत्तर दिलें कीं, 'देवानें तुम्हांस सांगितलें तें मलाच कां नाहीं सांगितलें ? मला सांगायला लाज वाटते की काय त्यांना ? त्यांना शेवटीं दर्शनाचे वेळीं एकदां असें दिसलें कीं 'आतां प्रदक्षिणा पुरे कर म्हणून आज्ञा करून श्रीगजाननानें त्यांच्या पायांवर तीर्थ शिंपडलें. दर्शनास जातांना पायांवर मोठी सूज होती, परत येऊन पहातात तों सूज मुळींच नाही! तेव्हां त्यांनी तें भाऊसाहेबांना दाखविलें. तो प्रकार पाहून मात्र त्यांची पक्की खात्री झाली, व त्यांनी पत्नीस रागें भरणे सोडून दिलें. जानकीबाईंनी अर्था- तच इतर कोणाच्याही दृष्टोत्पत्तीस हा प्रकार येऊं दिला नाहीं. पुढे फक्त श्री. अण्णासाहेब यांनाच तो ठाऊक होता, व त्यांनी सांगितल्यावरूनच तो मला ७